इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होईल. हा सामना १९ सप्टेंबर रोजी अबूधाबी येथे खेळला जाईल.
कोरोना विषाणू साथीमुळे यंदा ही स्पर्धा युएईमध्ये खेळली जात असून अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ २० सप्टेंबरला दिल्ली कॅपिटल विरुद्ध स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे.
इतर संघांप्रमाणेच किंग्स इलेव्हन पंजाबनेही यंदाच्या विजेतेपदासाठी कंबर कसली आहे. मैदानावर खेळाडू सराव करत आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, झेल, क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींचा सराव केला जात आहे. पंजाब संघात अनुभवी दिग्गज ४० वर्षीय ख्रिस गेलचा समावेश आहे. गेलची फिटनेस अजूनही उत्कृष्ट आहे, आणि त्याची फलंदाजीही जबरदस्त आहे. पंजाब संघाच्या सराव करतानाच्या व्हिडिओमध्येही याचं उदाहरण पाहायला मिळते.
People who think that's a six can reply to this tweet. ????#SaddaPunjab #Dream11IPL @henrygayle pic.twitter.com/mVnb6l8IcC
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 7, 2020
किंग्स इलेव्हन पंजाब दररोज खेळाडूंच्या नेट प्रॅक्टिसचे व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये ख्रिस गेलने पळत जाऊन बाऊंड्री लाइनवर झेल घेतला आहे. गेलने झेल घेतलेला व्हिडिओ पंजाबने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. गेलच्या या झेलच्या व्हिडिओवर आरसीबीच्या युजवेंद्र चहलने त्याला ट्रोल केले आहे.
खरं तर चहल आणि गेल बर्याचदा सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल करत असतात. चहलने आपल्या इंस्टा स्टोरीत गेलने घेतलेल्या झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे. आणि लिहिले. “अंकल … काय झेल घेतला आहे.”
किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ
केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, इशान पोरेल, मनदीप सिंह, जिमी नीशाम, तजिंदर सिंह, क्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मैक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कोटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नळकंडे, निकोलस पूरन, क्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सूचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलजोन, सिमरन सिंग
महत्त्वाच्या बातम्या –
या देशातील खेळाडूंना आयपीएलमधील एका तरी सामन्याला लागणार मुकावे; जाणून घ्या कारण
शाहरूख खानच्या नाईट रायडर्स संघाला तिसऱ्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी, तर…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलच्या १३ व्या मोसमात या ३ सलामीच्या जोड्या यूएईमध्ये उभारणार धावांचा डोंगर?
आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे