आयपीएल 2024 च्या 69व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद समोर पंजाब किंग्जचं आव्हान आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
पंजाब किंग्ज – प्रभसिमरन सिंग, अथर्व तायडे, रिली रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (कर्णधार/यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, शिवम सिंग, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, हर्षल पटेल, राहुल चहर
इम्पॅक्ट प्लेअर्स – अर्शदीप सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, विद्वथ कवेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया
सनरायझर्स हैदराबाद – अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन
इम्पॅक्ट प्लेअर्स – ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट
हैदराबादला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठ्या विजयाची अपेक्षा असेल. त्यांच्यासमोर पंजाबचा संघ आहे ज्यांचे जवळपास सर्व विदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. त्यामुळे हा संघ खूपच कमकुवत दिसतोय. या सामन्यात पंजाब किंग्जचं नेतृत्व यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा करणार आहे.
हैदराबादचा संघ पंजाबला मोठ्या फरकानं पराभूत करू इच्छितो, जेणेकरून राजस्थानचा संघ केकेआर विरुद्धचा सामना हरला तर हैदराबादला गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये राहण्याची संधी मिळेल. हैदराबादची खेळपट्टी धावांनी भरलेली आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळणार हे निश्चित आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! धोनीच्या षटकारामुळे जिंकली आरसीबी, कशी ते जाणून घ्या