असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी वयाची चाळिशी पार करूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. दुसरीकडे, याच वयाचे काही खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्येही खेळत आहेत. त्या खेळाडूंमध्ये अमित मिश्रा याच्या नावाचाही समावेश आहे. 40 वर्षीय मिश्राने आयपीएल 2023 स्पर्धेतील 10व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी पदार्पण केले आहे. मिश्राने दाखवून दिले आहे की, वय हा फक्त एक आकडा आहे.
शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात 40 वर्षीय अमित मिश्रा (40 year old Amit Mishra) याला दोन वर्षानंतर पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. लखनऊने त्याला आयपीएल 2023च्या मिनी लिलावात 50 लाख रुपयात संघात सामील केले होते.
We have two #LSG debutants -> Romario Shepherd and Amit Mishra 🧢#LSGvSRH | #IPL2023 | #LucknowSuperGiants | #GazabAndaz
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2023
अमित मिश्रा किती संघांकडून खेळला?
अमित मिश्रा आयपीएल इतिहासात आतापर्यंत 3 संघांकडून खेळला. त्यात दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश होता. यामध्ये आता आणखी एक संघाचे नाव जोडले गेले. अमित मिश्रा आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स या चौथ्या संघाकडून खेळताना दिसेल.
40-year-old Amit Mishra making the debut for LSG.
— Johns. (@CricCrazyJohns) April 7, 2023
अमित मिश्राची आयपीएल कारकीर्द
दुसरीकडे, अमित मिश्रा याच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याची गणना यशस्वी गोलंदाजांमध्ये होते. त्याने आतापर्यंत 155 आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 7.36च्या इकॉनॉमी रेटने 166 विकेट्स घेतल्या आहेत. 17 धावा देत 5 विकेट्स ही त्याची आयपीएल कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
हैदराबादचा डाव
या सामन्यात हैदराबाद नवीन कर्णधारासह मैदानात उतरला आहे. एडेन मार्करम (Aiden Markram) याच्याकडे संघाचे नेतृत्व असून त्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय लखनऊ सुपर जायंट्सने प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. हैदराबादच्या 9 षटकातच 55 धावांवर 4 विकेट्स गमावल्या. विशेष म्हणजे, मार्करम याला खातेही उघडता आले नाही. तो एकच चेंडू खेळून शून्यावर तंबूत परतला. (40 year old Amit Mishra making the debut for LSG in ipl 2023 10th match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण बनणार भारताचा पुढचा कर्णधार? सॅमसनचे नाव घेत एबी डिविलियर्सची मोठी भविष्यवाणी
दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख खेळाडू तडकाफडकी मायदेशी रवाना! जाणून घ्या कारण