मागच्या काही काळापासून अमेरिकेमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन दिले जात असल्याचे आपल्याला दिसले आहे. यूएसएने त्यांची एक क्रिकेट लीगही सुरू केली आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी अनेक खेळाडूंनी त्यांचा देश सोडला आणि यूएसमध्ये स्थलांतरीत झाले आहेत. यामधील अनेक खेळाडू येणाऱ्या काळात अमेरिकेसाठी क्रिकेट खेळताना दिसतील.
देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. मात्र, प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. काही खेळाडूंचे स्वप्न पूर्ण झाले तरीही त्यांना ते फार काळ टिकवता येत नाही. अनेकदा खराब प्रदर्शनामुळे त्यांना संघातून बाहेर केले जाते. असेच अनेक खेळाडू अमेरिकेच्या संघात खेळण्यासाठी तेथेच स्थायिक झाले आहेत. अमेरिकेत जाऊन क्रिकेट संघात सामील होण्यासंबंधी बऱ्याचशा बातम्या गेल्या काही काळात निदर्शनास आल्या आहेत. नजीकच्याच काळात न्यूझीलँडचा कोरी अँडरसन आणि पाकिस्तानचा समी असलमनेही हा निर्णय घेतला आहे.
या लेखात आपण अशाच ५ भारतीय क्रिकेटपटूंविषयी माहिती घेणार आहेत
सौरव नेत्रावलकर
सौरव मुंबईच्या संघासाठी रणजी ट्राॅफी खेळला आहे आणि भारताच्या १९ वर्षांखालील संघाचाही तो एक भाग होता. २०१८ मध्ये आयसीसीच्या नियमांमधील बदलांनंतर तो यूएसएच्या संघात खेळण्यासाटी पात्र ठरला. यूएसएच्या संघात सामील होण्यासाठी तेथे तीन वर्ष राहणे गरजेचे आहे. त्याने कमी काळातच तेथे त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने यूएसए संघाच्या प्रशिक्षकाला खुश केले आणि २०१९ मध्येच यूएसएच्या संघात सामील झाला. त्याचवर्षी विश्व क्रिकेट लीगच्या आधी तो त्याच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावार संघाचा कर्णधार झाला आहे.
स्मित पटेल
स्मित भारताच्या १९ वर्षांखालील संघामध्ये खेळलेला आहे. तो आता अमेरिकेत दमदार कामगिरी करत आहे. त्याने वयाच्या २८ व्या वर्षी भारतीय क्रिकेटला अलविदा केले होते. तो त्याचवर्षी बडोदा संघासाठी लिस्ट ए क्रिकेट खेळला होता. मात्र, भविष्याचा विचार करून त्याने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला.
स्मितने २०१२ मध्ये भारतीय १९ वर्षांखालील संघासोबत विश्वचषक खेळला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियविरुद्ध नाबाद ६२ धावा केल्या होत्या. त्याने ५५ प्रथम क्षेणी क्रिकेट सामने आणि ४३ लिस्ट ए सामने खेलले आहेत. याव्यतिरिक्त त्याने २८ टी२० सामनेही खेळले आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकूण १३ शतके केले आहेत. मात्र, त्याला भारतीय क्रिकेट कारकिर्दीत उज्ज्वल भविष्य घडवता आले नाही. त्यामुळे तो आता अमेरिकेसाठी क्रिकेट खेळतो आहे. स्मित पटेल कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही खेळताना दिसणार आहे. तो या लीगमध्ये बारबाडोड ट्रोइडेंट्स संघासाठी खेळाणार आहे.
तिमिल पटेल
उजव्या हाताचा फलंदाज आणि लेग स्पिनर तिमिल पटेल एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे आणि ही आश्चर्याची गोष्ट आहे की त्याला भारतात त्याची कारकीर्द बनवता आली नाही. पटेलने २००२ ते २०१० या काळात गुजरात संघासाठी रणजी ट्राॅफी खेळली आहे. २००३ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत तो इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्याने खेळलेल्या ३८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने एक शतक आणि दोन वेळा पाच विकेट घेतलेल्या आहेत.
२०१० मध्ये त्याने लाॅस ऍंजलिसला जाऊन अमेरिकेसाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने १५ मार्च मध्ये २०१९ अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत अमेरिकेसाठी ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि ७ टी२० सामने खेळले आहेत.
सिद्धार्थ त्रिवेदी
सिद्धार्थ भारतात रणजी ट्राॅफी खेळला आहे. त्यानंतर त्याने त्याचे पुढची कारकीर्द घडवण्यासाठी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे वय ३८ वर्ष आहे. त्याने भारतात ८२ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आणि त्यात २६८ विकेट्स मिळवल्या आहेत. सिद्धार्थ राजस्थान राॅयल्ससाठीही खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये ६५ विकेट्स घेललेल्या आहेत.
सिद्धार्थ मागच्या बऱ्याच काळापासून अमेरिकेत आहे आणि लवकरच मायनर क्रिकेट लीगमध्ये (एमएलसी) खेळताना दिसेल. सिद्धार्थ अमेरिकी क्रिकेट अकादमी आणि क्लबमध्ये खेळाडू-प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहे. त्याचा एमएलसीमध्ये संघ आहे.
सिद्धार्थ सर्वात आधी २०१९ मध्ये अमेरिकेत गेला होता, तेव्हा त्याने एटलांटा प्रिमियर लीगमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्याला अमेरिका क्रिकेट अकादमी आणि क्लबमध्ये बॅकरूम स्टाफच्या रूपात सामील होण्याचा प्रस्ताव मिळाला होता आणि तो आता क्लबचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार आहे.
सनी सोहल
पंजाबच्या मोहालीचा क्रिकेटपटू सनी सोहलने २००५ साली पंजाब संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचसोबत तो आयपीएल फ्रेंचायझी डेक्कन चार्जर्स, राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्जसाठी खेळलेला आहे. त्याने २२ आयपीएल सामन्यांमध्ये ३६८ धावा केल्या आहेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये १२०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. असे असले तरीही, त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही आणि यामुळेच अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचे ‘कॅप्टनकूल’ धोनीसोबत राहिले विवादात्मक नाते, एक तर आताही नाक मुरडतो!
तिसऱ्या टी२०त न्यूझीलंडचे दमदार पुनरागमन, बांगलादेशला ७६ धावांवर ऑलआऊट करत उडवला धुव्वा
रहाणे आऊट ऑफ फॉर्म आहे, म्हणून नव्हे तर ‘या’ कारणामुळे रवींद्र जडेजाला मिळाली ५ व्या क्रमांकावर बढती