संपुर्ण नाव- किर्तीवर्धन भागवत झा आझाद
जन्मतारिख- 2 जानेवारी, 1959
जन्मस्थळ- पुर्निया, बिहार
मुख्य संघ- भारत आणि दिल्ली
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचे फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध न्यूझीलंड, तारिख – 21 ते 25 फेब्रुवारी, 1981
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 6 डिसेंबर, 1980
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 7, धावा- 135, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 7, विकेट्स- 3, सर्वोत्तम कामगिरी- 2/84
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 25, धावा- 269, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 25, विकेट्स- 7, सर्वोत्तम कामगिरी- 2/48
थोडक्यात माहिती-
-किर्तीवर्धन भागवत झा आझाद हे राजकारणी कुंटुंबातील होते. त्यांचे वडील भागवत झा हे काँग्रेस पक्षातील बिहारचे माजी मुख्यमंत्री होते.
-किर्ती आझाद यांनी देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. ते 1993 पासून ते 1998 पर्यंत दिल्ली विधानसभेचे सदस्य होते. भाजपचे पक्षात असणारे आझाद 1999मध्ये बिहारमधील दरभंगाचे खासदार बनले. त्यानंतर परत त्यांनी 2 वेळा खासदारपद मिळवले.
-1977मध्ये आझाद यांनी भारतीय विद्यापीठांचे आणि 22 वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी मॅरिलबन क्रिकेट क्लबविरुद्ध सामने खेळले होते. पण यावेळी त्यांना 2 आकडी धावाही करता आल्या नव्हत्या.
-1980-81 मध्ये आझाद यांची ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली होती. वेलिंग्टन येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी कसोटीत पदार्पण केले होते. तर मेलबर्न येेथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून त्यांनी वनडेत पदार्पण केले होते.
-यानंतर 1983मध्ये त्यांना विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली होती. यावेळी त्यांनी मॅन्चस्टर येथे इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरित उल्लेखनीय गोलंदाजी केली होती. यावेळी त्यांनी इंग्लंडच्या मधल्या फळीतील विकेट्स घेण्याबरोबरच इयान बॉथम यांची महत्त्वपूर्ण विकेट घेतली होती.
-त्यांची मुले सुर्यवर्धन आणि सौम्यवर्धन यांनीही वयोगटातील क्रिकेट खेळले आहे. पण त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले नाही.