भारत विरुद्ध हाँगकाँग संघात बुधवारी (31 ऑगस्ट) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघाकडे सुपर-4 फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल. भारताने त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना जिंकत सुपर-4 मध्ये आधीच दावा ठोकला होता. यानंतर आता हाँगकाँगला पराभूत करत भारतीय संघ पुढील टप्प्यात दिमाखात प्रवेश करेल. तत्पूर्वी हाँगकाँगचा कर्णधार निजाकत खान याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
निजाकतने (Nizakat Khan) भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी (India vs Hongkong) भारताचा स्टार फलंदाज विराटची (Virat Kohli) प्रशंसा करत आपण त्याचे मोठे चाहते असल्याचे सांगितले. आपल्याला पुढे जाऊन कारकिर्दीत विराटसारखा फलंदाज बनायचे असल्याचे त्याने म्हटले आहे.
निजाकत म्हणाला की, “मी विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे. मी त्याला पाहून प्रेरित होत असतो. मला त्याचासारखे बनायचे आहे. त्याने स्वतला खूप फिट ठेवले आहे. त्याने त्याच्या खेळाने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला आहे, याचसाठी तो माझा आदर्श आहे.”
भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याबद्दल बोलताना निजाकत म्हणाला की, “आमच्यासाठी हा खूप मोठा सामना आहे आणि आम्ही या सामन्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. मागील काही सामन्यात आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळले आहे. आम्ही पात्रता फेरीतील सामन्यांमध्येच दाखवून दिले की, आम्ही मोठमोठ्या संघांनाही चांगलीच टक्कर देऊ शकतो. 2018 मध्ये आम्ही भारताकडून फक्त 20 धावांनी हरलो होतो. परंतु टी20 क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकते.”
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग (Predicted Playing Xi) इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, आर अश्विन, आवेश खान, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह
हाँगकाँग: निजाकत खान (कर्णधार), बाबर हयात, यास्मीन मुर्तजा, किनचित शाह, स्कॉट मैककेनी (यष्टीरक्षक), हारून अरशद, एजाज खान, जीशान अली, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गजानफर
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
Video: श्रीनाथ यांनी टाकलेला तो घातक चेंडू, ज्यामुळे फलंदाज जखमी होऊन पडला होता खाली
झादरान द फिनिशर! अफगाणी फलंदाजांचा चमत्कारिक सिक्स, पुल आणि स्कूपचे केले मिश्रण
एकेकाळी काट्याची टक्कर देणाऱ्या हाँगकाँगविरुद्ध भारत करणार प्रयोग! अशी असेल प्लेइंग इलेव्हन