इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला हंगामातील पहिला विजय मिळवाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या या सामन्यात सीएसकेने २३ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा आणि मध्यक्रमात शिवम दुबेने दिलेल्या महत्वाच्या योगदानामुळे सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभी केली होती. प्रत्युत्तरात आरसीबीला हे लक्ष्य गाठता आले नाही. सामन्यात सीएसकेच्या फलंदाजांनी एकूण १७ षटकार ठोकले, ज्याच्या जोरावर संघाने विजय मिळवला.
सीएसकेचा सलामीवीर फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने ५० चेंडूत ४ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने ८८ धावा केल्या. तसेच, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या युवा शिवम दुबे (Shivam Dube) याने ४६ चेंडूत ९५ धावा ठोकल्या. यादरम्यान दुबेच्या बॅटमधून ५ चौकार आणि ८ षटकार निघाले आणि त्याने चालू हंगामातील स्वतःच्या २०७ धावा देखील पूर्ण केल्या. या दोघांनी मिळून सामन्यात १७ षटकार ठोकले. म्हणजेच या १७ चेंडूंनी सामन्याला दिशा देण्याचे काम केले. चला तर जाणून घेऊया कोणत्या फलंदाजाला किती षटकार मारले गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
उथप्पा आणि दुबे सोडले, तर सीएसकेसाठी इतर कोणताच फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर टिकला नाही. आरसीबीच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्यांच्यासाठी ६ गोलंदाजांनी या सामन्यात गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि फिरकी गोलंदाजी करणारा ग्लेन मॅक्सवेल यांनी या सामन्यात प्रत्येकी ४-४ षटकार दिले. त्यानंतर जोस हेजलवुड आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी ३-३ षटकार दिले. मोहम्मद सिराजला २ आणि शाहबाज अहमदला १ षटकार बसला.
आरसीबीने चालू आयपीएल हंगामात चांगले प्रदर्शन केले आहे. मात्र, सीएसकेने त्यांना हंगामातील दुसरा पराभव दिला. पराभव स्वीकारल्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्यांच्या वेगवान गोलंदाज हर्षल पटेलची कमी भासल्याचे सांगितले. दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर हर्षल पटेलच्या बहिणीचे अचानक निधन झाल्यामुळे त्याला बायो- बबल सोडावा लागला होता. पुढच्या काही सामन्यांमध्येही हर्षल पटेल उपस्थित राहण्याची कसलीही शक्यता नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL2022| मुंबई वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
Video: ‘कॅप्टनकूल’च्या रणनीतीमध्ये फसला विराट; पुल शॉट मारायच्या नादात ‘अशी’ दिली विकेट
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर