पाकिस्तान संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका खेळत असताना इर्तुगुल या तुर्कीश ब्लॉकबस्टर सिरीजमधून संघाला प्रेरणा मिळत असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने सांगितले आहे.
सध्या पाकिस्तानचा संघ आजपासून इंग्लंड विरुद्ध तिसरा कसोटी सामना साऊथँम्पटन येथे खेळत आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकता-जिंकता थोडक्यात गमावला होता. तर दुसऱ्या सामन्यात पावसामुळे बराच व्यत्यय आला, परिणामी हा सामना अनिर्णित राहिला, त्यामुळे पाकिस्तानसाठी मालिकेतील पराभव टाळायचा असेल तर तिसरा सामना जिंकणे आवश्यक आहे. अशा वेळी देखील संघाचे मनोबल चांगले असल्याचेही अझरने स्पष्ट केले.
तिसऱ्या सामन्याआधी शुक्रवारी बोलताना अझर इर्तुगुलबद्दल म्हणाला, ‘मला वाटत नाही की या संघात एकही असा खेळाडू असेल जो इर्तुगुल पहात नसेल.’
ही सिरिज २०१४-२०१९ दरम्यान प्रसारित झाली होती. या सिरिजचे ५ सिजन आहेत. अझरच्या मते या सिरिजने संघाचे मनोबल वाढवले आहे. इर्तुगुल ही तुर्की साम्राज्याचा संस्थापक उस्मानवर आधारित आहे. ही कथा ही एक काल्पनिक आणि साहसी मालिका आहे.
तसेच अझर पत्रकार परिषदेत म्हणाला, ‘मी भाग्यवान आहे की माझ्याकडे एक चांगला संघ आहे. त्यांनी खरोखरच चांगले सांभाळुन घेतले आहे, त्यामुळे माझ्यासाठी माझे काम सोपे झाले. त्यामुळे मी आमच्या रणनीतीकडे लक्ष केंद्रित करतो. मला आशा आहे की तिसरी कसोटी जिंकून आम्ही पुढे जाऊ.’
पहिल्या कसोटीच्या दोन डावांमध्ये अझरने अवघ्या 18 आणि 0 धावा केल्या. याबद्दल पाकिस्तानचा कर्णधार अझर म्हणाला, हे खरे आहे की मी मोठी धावसंख्या उभारू शकलो नाही, परंतु मला माहित आहे की मी चांगल्या लयीत आहे आणि लवकरच गोष्टी चांगल्याप्रकारे हाताळेल.
याबरोबरच अझरने ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधू अशी आशाही व्यक्त केली आहे.
तसेच त्याने नसीम शाह आणि शाहिन आफ्रिदीलाही पाठिंबा दिला, तो म्हणाला, जर त्यांना खेळवले नाही तर त्यांना अनुभव मिळणार कसा. त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देऊ.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा घनिष्ठ मित्र असलेल्या रैनावरच चढला होता धोनीचा पारा; या माजी खेळाडूने सांगितला किस्सा
सचिन विराटच्या बॅटची काळजी घेणारा देतोय मृत्यूशी झुंज, काही क्रिकेटरकडून तर…
चेन्नई सुपरकिंग्सचा हा दिग्गज खेळाडू दुसऱ्यांदा झाला पिता
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना फ्लॉप ठरलेले ३ टी२० क्रिकेटमधील दिग्गज
५ वेळा क्रिकेट इतिहासात गोलंदाज झाले ओपनर, केल्या धमाकेदार खेळी
राष्ट्रगीताला न थांबणाऱ्या महान क्रिकेटरची कॉलर पकडणारा डाव्या हाताचा ऑस्ट्रेलियाचा लक्ष्मण