सध्या प्रत्येक क्रिकेट चाहता आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. कोविड-१९ साथीमुळे भारतात आयोजलेले आयपीएल २०२१ अर्ध्यातूनच स्थगित करण्यात आले होते. जेव्हा ही लीग मध्यंतरी पुढे ढकलण्यात आली, तेव्हा २९ सामने खेळले गेले आणि आता उर्वरित ३१ सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळवले जातील. आता पुन्हा एकदा प्रत्येक संघ विजेतेपदासाठी पूर्ण जोर लावताना दिसणार आहे. आयपीएलचा दुसरा टप्पा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने सुरू होणार आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी अंतिम सामन्यातील दावेदार संघांविषयी भाकित केले आहे.
चोप्रा यांनी सांगितले की, आयपीएलच्या १४ व्या हंगामात कोणते दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील? त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत प्रश्न-उत्तर सत्र आयोजित केले होते. ज्यात त्यांना विचारण्यात आले की, यावेळी कोणता संघ विजेता बनणार आहे? याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई यांच्यात खेळला जाईल. मात्र, कोणता संघ विजेतेपद पटकावणार? याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही.
आयपीएलचा शेवटचा हंगाम यूएईमध्ये झाला होता. जिथे मुंबई संघाने दिल्लीला अंतिम फेरीत पराभूत करून विक्रमी पाचव्यांदा जेतेपद पटकावले होते. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्ज संघ पहिल्यांदाच प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नव्हते.
मात्र यावेळी त्यांनी या हंगामात चांगले पुनरागमन केले आहे आणि पहिल्या भागाच्या अखेरीस हा संघ १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या संघाने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत, तर ३ सामने गमावले आहेत. ८ गुणांसह हा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला फिरकीपटूच्या ‘जादुई स्पिन’ने काही कळायच्या आतच फलंदाज बोल्ड, व्हिडिओ पाहून आठवेल शेन वॉर्न
कुंबळे अन् जाफरमध्ये जोरदार जुगलबंदी; ‘कभी अलविदा ना कहना’, गात रंगवली मैफिल- VIDEO
पहिल्याच सामन्यात सीएसकेला धोबीपछाड देण्यासाठी रोहित ‘अशी’ घेतोय मेहनत, फोटो व्हायरल