भारतीय संघाला न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना झाल्यानंतर शूबमन गिल दुखापतग्रस्त असल्याचे उघडकीस आले होते. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे गिलऐवजी संघात कोणाला स्थान द्यावे? हा प्रश्न संघ व्यवस्थापकांना पडला आहे. कर्णधार विराट कोहलीकडे अभिमन्यु ईश्वरनसारखा सलामीवीर असताना देखील त्यांनी पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलवण्याची मागणी केली होती. परंतु निवडकर्त्यांनी यावर प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे पुन्हा एकदा संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते यांच्यात वाद सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु हे असे पहिल्यांदा होत नाही. यापूर्वी देखील असे अनेकदा पाहायला मिळाले आहे, जिथे कर्णधाराला हवा असलेला खेळाडू उपलब्ध करून देण्यास निवडकर्त्यांनी नकार दिला आहे. (Abhimanyu Easwaran again pits alpha male captain against selectors)
यापूर्वी ६० च्या दशकाच्या अखेरीस आणि ७० च्या दशकाच्या सुरुवातीला बंगाल संघाचे एक यष्टीरक्षक फलंदाज होते, ज्यांचे नाव रुसी जिजीभाई असे होते. त्यांनी ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. यामध्ये त्यांची फलंदाजी सरासरी १०.४६ होती. भारतीय संघ १९७१ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार होता. या दौऱ्यासाठी तिसऱ्या यष्टीरक्षकाचे स्थान रिकामे होते. त्यामुळे सर्वांचेच लक्ष दिलीप ट्रॉफी स्पर्धेकडे लागून होते. ज्यामध्ये ईस्ट झोनचे नेतृत्व रमेश सक्सेनाच्या हाती होते. तसेच दलजीत सिंग हे यष्टिरक्षण करणार होते.
या सामन्यातील एका खेळाडूने पीटीआयला सांगितले होते की, “निवड समितीचे अध्यक्ष विजय मर्चंट यांनी नाणेफेक होण्यापूर्वी रमेश भाईला बोलावून घेतले. तसेच त्यांनी दलजीतला फलंदाज म्हणून आणि रूसीला यष्टिरक्षक म्हणून खेळवण्यास सांगितले. रमेश भाईला त्यांचे बोलणे टाळता आले नाही.”
जिजिभाईची निवड वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी करण्यात आली होती. हाच दौरा त्यांचा पहिला आणि शेवटचा दौरा ठरला होता. त्यांनी ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले होते, ज्यामधे त्यांची सर्वोत्तम खेळी ३९ धावांची होती. नवनिर्वाचित कर्णधार अजित वाडेकर हे त्याच्या निवडीवरून दिग्गज खेळाडू विजय मर्चंटसोबत वाद घालू शकत नव्हते.”
तसेच बंगालचे माजी कर्णधार संबरन बॅनर्जी यांनी म्हटले होते की, “१९७९ मध्ये सुरींदर खन्नासह माझे इंग्लंडला जाणे ठरले होते.परंतु शेवटच्या क्षणी तामिळनाडूच्या भरत रेड्डी यांना संघात स्थान देण्यात आले होते. तसेच १९८६ मध्ये कपिल देव यांनी इंग्लंड दौऱ्यावर असताना, मनोज प्रभाकर ऐवजी मदन लाल यांना संघात स्थान दिले होते. जे त्यावेळी इंग्लंडमध्ये क्लब क्रिकेट खेळत होते.”
महत्वाच्या बातम्या-
माजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर बनले भारताचे नवे क्रीडामंत्री, रवी शास्त्रींनी केले अभिनंदन
इंग्लंडने रचला इतिहास, डेनमार्कला २-१ने पराभूत करत तब्बल ५५ वर्षांनंतर गाठली फायनल
रॉजर फेडररचे विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात; तब्बल १९ वर्षांनंतर झाला ‘असा’ पराभव