सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेड (The Hundred) लीगचे वारे जोरात वाहत आहेत. विल स्मिड हा या लीगमध्ये शतक करणारा पहिला खेळाडू ठरला, तर ड्वेन ब्रावोनेही टी२० प्रकारात ६०० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तर कायरन पोलार्डने ६००वा टी२० सामना या लीगमध्येच खेळला आहे. अशी विक्रमे होत असताना ही लीग चांगलीच प्रसिद्ध होत आहे, मात्र त्याला आता गालबोट लागले आहे. फॉर्ममध्ये असलेल्या एका खेळाडूला स्पर्धेत गोलंदाजी करण्याची बंदी केली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) त्याच्यावर ही बंदी आणली आहे.
इंग्लिश क्रिकेटपटू ऍडन लिथ (Adam Lyth) त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवर आक्षेप घेतला आहे. त्याची गोलंदाजी अवैध असल्याचा निर्वाळा दिल्याने त्याला आता ईसीबीच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये गोलंदाजी करता येणार नाही. तसेच त्याची वैयक्तिक चाचणी देखील आयोजित केली आहे. ती लाफबोरह विद्यापीठात घेतली जाणार आहे. यामध्ये त्याच्या गोलंदाजीची ऍक्शन वैध की अवैध याची तपासणी केली जाणार आहे. याबाबत ईसीबीने विधान केले की, ईसीबीच्या नियामानुसार निलंबित केलेल्या संशयित गोलंदाजीच्या ऍक्शनबाबात ठरलेल्या प्रक्रियप्रमाणे तपासणी केली जाणार आहे.
ऍडम या ३४ वर्षीय डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने वीस हजारपेक्षा अधिक प्रथम श्रेणी धावा केल्या आहेत. तसेच तो फिरकीपटूही आहे. यॉर्कशायरकडून प्रथम श्रेणीचे सामने खेळणारा हा ऍडम सुरू असणाऱ्या द हंड्रेड लीगमध्ये नॉर्थन सुपरचार्जर्सचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याने यावर्षी झालेल्या व्हायट्यलिटी ब्लास्टच्या उपांत्य फेरीत एक षटक टाकताना १५ धावा दिल्या होत्या. त्यावेळी मैदानावरील अंपायर डेविड मिलन्स आणि नील मॅलेंडर यांनी सामन्यांनतर त्याच्या गोलंदाजीच्या ऍक्शनवर आक्षेप घेतला होता.
ऍडमला पुढील सगळ्या सामन्यात गोलंदाजी करण्याची बंदी केली आहे. त्याच्या या बंदीचे नुकसान यॉर्कशायर आणि नॉर्थन सुपरचार्जर्स संघाला होणार नाही, कारण तो द हंड्रेड लीगमध्ये आणि इतर सामन्यांमध्ये त्यांचा नियमित गोलंदाज नाही.
ऍडम हा प्रथम श्रेणीतील उत्तम फलंदाज ठरला आहे. त्याने १० काउंटी सामन्यांमध्ये ३८च्या सरासरीने ६०८ धावा केल्या आहेत. तसेच तो व्हायट्यलिटी ब्लास्ट २०२२मध्ये यॉर्कशायरकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने १६ सामन्यांत ५२५ धावा केल्या होत्या. तसेच त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १७७.३६ राहिला.
द हंड्रेड लीग २०२२च्या हंगामात ऍडम सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ३ सामन्यांत ४३.३३च्या सरासरीने १३० धावा केल्या आहेत. तसेच त्याने इंग्लंडकडून २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत ७ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एक शतक देखील केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेची मालकी असलेल्या ‘या’ संघाचा मेंटॉर नाही बनू शकणार धोनी, बीसीसीआय ठरलीय कारण
भारतीय खेळाडूचा टी२० लीगमध्ये शतकी तडाखा, अजून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पणही नाही झाले