आग्रा (उत्तर प्रदेश) येथील पाली गावातील (फत्तेपूर) रामू जाट या एका शेतकर्याच्या पोराने ‘पुश इंडिया पुश’ स्पर्धेच्या ठिकाणी तब्बल अडीच हजार बैठका मारल्या. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात त्याने रविवारी हा पराक्रम केला.
घामाघूम झालेल्या रामू जाट अखेर स्पर्धा आयोजकांनी थांबण्याची विनंती केली. आपण दिवसभर बैठका मारू शकतो, असे रामूचे म्हणणे आहे. त्याच्या या पराक्रमाबद्दल “पुश इंडिया पुश” या क्रीडा महोत्सवाचे आयोजक आदर्श सोमानी यांनी रामू जाट व त्याचे वडील बाबूलाल यांचा दहा हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरव केला. रामू कुठल्याही जिममध्ये जात नाही. केवळ गावठी व्यायामाने त्याने आपले शरीर कमाविलेले आहे. त्याने अंगावरील कपडे उतरवून आपल्या आखीव-रेखीव व पिळदार देहयष्टीचे दमदार प्रदर्शन दाखवीत उपस्थित प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. (Admirable… the farmer’s son killed two and a half thousand meetings!)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रेविस हेडने केली सुखी संसाराला सुरुवात, प्रेयसी जेसिकासोबत बांधली लग्नगाठ
अहमदाबादमध्ये सॅमसन-हेटमायरचे तुफान! गुजरातला लोळवत राजस्थान टॉपवर