विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी आतापर्यंत चांगली राहिली आहे. भारतीय संघानी आपले तिन्ही सामने जिंकले असून तिन्ही सामन्यात अतिशय चांगले विजय मिळवले आहेत. मात्र, केवळ एक सामना गमावल्यास भारतीय संघ दडपणाखाली येईल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने व्यक्त केला आहे. रिकीच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाने आतापर्यंत कितीही चांगला खेळ केला असला, तरी केवळ एक सामना गमावल्याने खेळाडू आणि संघावर दडपण येईल.
रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याचा असा विश्वास आहे की, भारतीय संघाने फक्त एक सामना गमावल्यास परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. पुढे तो म्हणाला की, “भारतीय संघातील अनेक खेळाडू चांगले खेळत आहेत परंतु केवळ एक सामना खराब गेल्याने केवळ खेळाडूंवरच नव्हे तर संपूर्ण संघावर दबाव येतो. निश्चितच संघाची सुरुवात चांगली झाली आहे आणि त्यामुळे ते खूप आनंदी असतील. संघाचे सर्व खेळाडू चांगले आहेत. वेगवान गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी तर वरच्या फळीतील आणि मधल्या फळीतील फलंदाजी हे सर्व उत्कृष्ट आहे. भारतीय संघाला पराभूत करणे खूप कठीण असेल. मात्र, हा संघ दडपणाखाली कसा खेळतो हे पाहायचे आहे. भारतीय संघावर कोणतेही दडपण नसेल असे आम्ही अजिबात म्हणू शकत नाही. कधीतरी संघ नक्कीच दडपणाखाली येईल.”
भारतीय संघाबद्दल बोलायचे झाले तर, या संघाने आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत. संघाने आधी ऑस्ट्रेलिया, नंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारतीय संघ सध्या तीनपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.
भारताचा विश्वचषक 2023 मधील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध पुणे येथे होणार आहे. भारत हा सामना जिंकुन गुणतालिकेतील आपलं पहिलं स्थान मजबुत करण्याच्या प्रयत्नात असेल तर, बांगलादेश विश्वचषक 2023 मधील दुसरा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
After losing just one match Ricky Ponting shocking statement about Indian team
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण