भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका उद्यापासून (५ फेब्रुवारी) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू होणार आहे. कोरोना संकटामुळे जवळपास एका वर्षानंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार असल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. आयपीएल सुरू झाल्यापासून परदेशी खेळाडूंना दरवर्षी भारतीय भूमीवर क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर फलंदाजी आणि गोलंदाजी कशी असावी? याबद्दलचे त्यांचे ज्ञान वाढले आहे आणि हे त्यांच्या भारत दौऱ्यावर राष्ट्रीय संघासह खेळताना अचूकपणे दिसून येते.
गेल्या काही वर्षापासून इंग्लंडचे खेळाडू नियमितपणे आयपीएलमध्ये खेळत आहेत. यावेळी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघात बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो आणि जोफ्रा आर्चर असे बरेच खेळाडू आहेत, जे आयपीएलच्या अनुभवावर भारताविरुद्ध योग्य रणनीती आखू शकतात. परंतु भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणे याचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचे खेळाडू नियमितपणे आयपीएल खेळत असूनही त्यांना भारतीय खेळाडूंची रणनीती माहिती नसणार.
याविषयी बोलताना रहाणे म्हणाले की, “कसोटी क्रिकेट हे इतर सामन्यांच्या तुलनेत फार वेगळे असते. आम्ही आयपीएलमध्ये आमच्या युक्त्या त्यांच्यासोबत शेअर करत नाही. आम्ही एकत्र खेळतो परंतु देशाकडून खेळताना आपल्याला वैयक्तिक आणि संघ म्हणून वेगळी कामगिरी करायची असते. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर चांगले खेळाडू आहेत. ते इंग्लंडकडून चांगली कामगिरी देखील करत आहे. परंतु कोणता एकटा खेळाडू कसोटी जिंकू शकत नाही. या सर्व गोष्टी संघाशी निगडित असतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याचं प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणं कठीण, तरीही ‘या’ कारणामुळे केली कसोटी संघात निवड
“भारताप्रती तुझं प्रेम पाहून आनंद वाटला”, पीटरसनच्या ट्विटवर मोदींची मन जिंकणारी प्रतिक्रिया