भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आज प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला. वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेला २ दिवस राहिले असताना कुंबळेने हा राजीनामा दिला आहे.
आज अर्थात २० जून रोजी कुंबळेचा १ वर्षांचा प्रशिक्षक म्हणून कराराप्रमाणे कार्यकाळ संपला आहे. कुंबळेने प्रशिक्षक म्ह्णून भारतीय संघाची जबाबदारी २०१६ पासून सांभाळण्यास सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीत पहिल्याच कसोटी मालिकेत भारतने वेस्ट इंडिजवर विजय मिळवला.
कुंबळे प्रशिक्षक असताना भारताने एकूण १७ कसोटी सामने खेळले. त्यात १२ विजय, १ पराभव आणि ४ सामने ड्रा राहिले. एकदिवसीय सामन्यात भारताने १३ सामन्यात ८ विजय आणि ५ पराभव पहिले तर भारत एकूण ५ टी२० सामने कुंबळे प्रशिक्षक असताना खेळला. त्यात २ विजय. २ पराभव आणि १ सामना अनिर्णित राहिला.