भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने सेंच्युरियनमध्ये झालेल्या बारताच्या पराभवावर मोठे वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, केएल राहुल आणि विराट कोहली व्यतिरिक्त या सामन्यात इतर कोणत्याही खेळाडूने चांगली कामगिरी केली नाही. येथे त्याने भारतीय फलंदाजांच्या कमजोरीही सांगितल्या.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) म्हणाला, “सामन्याचा तिसरा दिवस सुरू झाला तेव्हा मला वाटले की, भारतीय संघ आता पुनरागमन करेल. पण हे होऊ शकले नाही. हा पराभव खरोखरच लज्जास्पद आहे. पहिल्या डावात केएल राहुल (KL Rahul) आणि दुसऱ्या डावात विराट कोहली (Virat Kohli) वगळता अन्य कोणताही भारतीय खेळाडू छाप पाडू शकला नाही.”
आकाश पुढे म्हणाला, “कठोर फलंदाजी करण्याचे धाडसही कोणी दाखवले नाही, ना कोणी अंगावरील चेंडूचा सामना करायला तयार होता ना कोणी काही काळ खेळपट्टीवर थांबण्याचा विचार करत होता. दोन्ही डावात रोहित शर्मा (Rohit Sharma) कागिसो रबाडा (Kagiso Rabada) याच्या चेंडूवर बाद झाला. यशस्वी जयसवाल अजूनही अशा प्रसंगांना तोंड देण्यापासून दूर असल्याचे दिसते. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इतका चांगला दिसत नव्हता. भारताने येथे चार ते पाच सत्रे फलंदाजी करायला हवी होती पण तसे होऊ शकले नाही.”
सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. येथे केएल राहुल (101) आणि विराट कोहली (76) यांच्याशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाने मोठी खेळी खेळली नाही. गोलंदाजीतही फक्त जसप्रीत बुमराह याने 4 विकेट्स घेतल्या. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकेतील विजयाचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत प्रोटीज आता 1-0 ने पुढे आहे. (Anyone but Rahul-Virat former cricketer’s big statement on India’s defeat in Centurion)
हेही वाचा
‘या’ 3 संघांना भारताने सर्वाधिक वेळा कसोटी सामन्यांमध्ये केलेय पराभूत
IND vs SA: दुसऱ्या कसोटी विजयासाठी केएल राहुल नेटमध्ये गाळतोय घाम, पाहा व्हिडिओ