भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या टी२० मालिका खेळली जात आहे. मात्र, सर्वांची नजर १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर आहे. २०१८-२०१९ मध्ये भारतीय संघाने ही मालिका जिंकत, ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ होण्याचा मान मिळवला होता. त्यामुळे, या वेळीही या मालिकेची जोरदार चर्चा आहे. आगामी मालिकेत भारत आपले जेतेपद राखणार का याची सर्वांना उत्सुकता आहे.
त्यापूर्वी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला सराव सामना आज सिडनी येथे सुरू झाला. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने शानदार अर्धशतक ठोकले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्याला बाद करण्यासाठी वेगळी रणनीती तयार केलेली दिसून आली.
भारताने केली प्रथम फलंदाजी, पुजाराने झळकावले अर्धशतक
नाणेफेक जिंकल्यानंतर भारत अ संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यानंतर कर्णधार रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी ७६ धावांची भागिदारी केली. पुजाराने जेम्स पॅटिन्सनच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी १४० चेंडूत ५४ धावा केल्या.
पुजाराला बाद करण्यासाठी वापरली ही रणनिती
जवळपास नऊ महिन्यांनंतर स्पर्धात्मक क्रिकेट खेळणार्या पुजाराला पुन्हा फॉर्म मिळण्यास फारसा वेळ लागला नाही. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत पाच चौकार ठोकले. त्यापैकी तीन चौकार फाईन लेगला लगावले. पुजाराने ४५ व्या षटकात डीप मिडविकेटवर चेंडू ढकलत तीन धावा काढून अर्धशतक पूर्ण केले. मात्र, ४७ व्या षटकात पॅटिन्सनच्या चेंडूवर लेग गलीमध्ये तो हॅरिसनच्या हाती झेल देत बाद झाला.
An unusual tactic from Australia A, but it's done the trick to get the massive wicket of Cheteshwar Pujara
WATCH LIVE: https://t.co/bz6aBDzoh4 #AUSAvIND pic.twitter.com/N9hGteHDpB
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2020
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुजाराला बाद करण्यापूर्वी वारंवार आखूड टप्प्याची गोलंदाजी केली. आगामी मालिकेत देखील ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज पुजाराविरुद्ध हीच रणनीती वापरण्याची शक्यता आहे. भारताच्या बऱ्याच खेळाडूंना आखूड टप्प्याचे चेंडू खेळताना त्रास होतो. मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने ५२१ धावा बनवल्या होत्या. ज्यात एक द्विशतक व दोन शतकांचा समावेश होता.
पहिल्या दिवशी भारताने उभारली २३७ अशी धावसंख्या
सिडनीतील ड्रूमन ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या या सराव सामन्यात भारत अ संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ८ बाद २३७ धावा बनविल्या आहेत. रहाणे व्यतिरिक्त भारताकडून पुजाराने ५४ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जेम्स पॅटिन्सन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन बळी मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बर्थडे बॉय’ श्रेयस अय्यरने टिपला अफलातून झेल, पाहा Video
VIDEO : ‘कन्कशन सब्टीट्यूट’ म्हणून चहलची निवड केल्याबद्दल थेट सामना रेफरीशी भिडले लँगर
ट्रेंडिंग लेख-
मराठीत माहिती- क्रिकेटर जसप्रीत बुमराह
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग
मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर