पुणे। जनादेश संघाने आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला तर एच पी रॉयल्स संघाने मेट्रोइट्स संघाला पराभूत करताना आझम महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत जनादेश व एच पी रॉयल्स संघ आमने-सामने असणार आहेत.
आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये जनादेश संघाने आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला ७ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १०९ धावांपर्यंत मजल मारली. संजना शिंदे सर्वाधिक २५ (४ चौकार) धावांची खेळी केली. तिला जाई शिंदेने २१ (२ चौकार), उत्कर्षा पवारने १९ (२ चौकार), किरण नवगिरे १६ (२ चौकार) धावा केल्या. कश्मीरा शिंदेने ३, तेजल हसबनीस व प्रियांका कुंभार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
जनादेश संघाने केवळ १७.१ षटकांत ३ बाद ११० धावा करताना विजय साकारला. मानसी तिवारीने सर्वाधिक नाबाद ३५ (४ चौकार) धावा करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भूमिका उंबरजेने २० (३ चौकार) तर तेजल हसबनीसने १६ (२ चौकार) धावा केल्या. किरण नवगिरेने एक गडी बाद केला. जनादेश संघाच्या कश्मिरा शिंदेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीमध्ये एच पी रॉयल्स संघाने मेट्रोइट्स संघाला ६४ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना एच पी रॉयल्स संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १२८ धावसंख्या उभारली. मुक्ता मगरेने आक्रमक फलंदाजी करताना ५० चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने ६० धावांची खेळी केली. तिला गौतमी नाईकाने ३५ (३ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. सायली लोणकरने १९ (३ चौकार) धावा केल्या. संजूला नाईकने २ तर श्रेया परब व सोनाली शिंदे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
एच पी रॉयल्सचे आव्हान मेट्रोइट्स संघाला पेलवले नाही. मेट्रोइट्स संघाने निर्धारित २० षटकांत ९ बाद ७४ धावा करू शकला. संजूला नाईकने एकाकी लढत देताना ३६ चेंडूत ५ चौकारांच्या सहाय्याने ३६ धावांची खेळी केली. बाकी कोनात्याही फलंदाजाला दोन आकडी संख्या गाठता आली नाही. सोनल पाटीलने ३, पूनम खेमानारने २ तर अभिलाषा पाटील, मुक्ता मगरे व सायली लोणकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मुक्ता मगरेला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
नाट्यमय सामन्यात जमशेदपूरचा विजय; गतविजेत्या मुंबई सिटीची पुढील वाटचाल बिकट!
पटनाला पराभूत करत दबंग दिल्ली प्ले-ऑफ्समध्ये!
फिंच म्हणतोय, “मला माहित होते माझ्यावर बोली लागणार नाही”