भारतीय संघाने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो आर अश्विन ठरला. त्याने महत्त्वाच्या क्षणी भारताचा डाव सांभाळला आणि श्रेयस अय्यर याच्यासोबत अर्धशतकी भागीदारी रचत संघाला विजयी केले. या विजयानंतर अश्विनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे, यावेळी त्याने भारतीय खेळाडूंच्या बचावात्मक पवित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चला तर जाणून घेऊयात काय म्हणालाय अश्विन.
‘आमच्या फलंदाजांना स्वत:च्या बचावात्मक पवित्र्यावर…’
आर अश्विन (R Ashwin) याने सामन्यानंतर म्हटले की, “मुख्य फलंदाजांची फळी संपली होती. हा एक असा सामना होता, जो आम्ही निसटू दिला नाही आणि हा आधीच संपवू शकलो असतो. श्रेयस अय्यर याने खूपच चांगली फलंदाजी केली. कधी-कधी अशाप्रकारच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला पुढचा विचार करावा लागतो. बांगलादेशच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केला, पण आमच्या फलंदाजांना स्वत:च्या बचावात्मक पवित्र्यावर लक्ष दिले नाही. इथे खेळपट्टी चांगली आहे आणि मला वाटते की, चेंडू थोडा लवकर नरम झाला. बांगलादेशलाही आमच्यावर दबाव बनवण्याचे श्रेय जाते.”
भारतीय संघाचा डाव
भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत विजयासाठी 145 धावांची गरज होती. मात्र, भारतीय संघाने फक्त 74 धावांपर्यंत 7 विकेट्स गमावल्या होत्या. यावेळी असे दिसत होते की, बांगलादेश या सामन्यात विजय मिळवेल. मात्र, आर अश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 8व्या विकेटसाठी 71 धावांच्या भागीदारीसह भारताला यादगार विजय मिळवून दिला. यादरम्यान अश्विनने 62 चेंडूत नाबाद 42 आणि श्रेयसने नाबाद 29 धावा केल्या.
विशेष म्हणजे, आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा हा 14 सामन्यांतील 8वा विजय आहे. तसेच, 99 गुणांसह आणि 58.93 टक्के विजयासह दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, बांगलादेश संघ शेवटच्या स्थानी आहे. बांगलादेशचा हा 12 सामन्यांमधील 11 वा पराभव ठरला. (ban vs ind 2nd test ravichandran ashwin reacts on his brilliant batting know more)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच