क्रिकेट विश्वामध्ये अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. ज्यांनी क्रिकेट विश्वात आपल्या खेळाची छाप सोडली आहे. आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने इतिहास गाजवला आहे. परंतु काही खेळाडूंचे विशिष्ट जागेत शॉट खेळायची आवड असते. आणि त्याच ठिकाणी धावा देखील खूप काढतात. परंतु असे काही खेळाडू आहेत ते मैदानाच्या चारही बाजूला शॉट खेळतात.
यातीलच एक खेळाडू म्हणजे एबी डीविलियर्स. त्याला याच कारणामुळे मिस्टर 360 डिग्री या नावाने ओळखले जाते. डीविलियर्स मैदानाच्या चारही बाजूला शॉट खेळत धावा बनवतो. मात्र आता भारतीय संघाचे माजी फलंदाज प्रशिक्षक संजय बांगर यांनी याच दरम्यान एक मोठे वक्तव्य केले. त्यांनी भारतीय संघातील 360 डिग्री फलंदाजी करू शकणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगितले आहे. त्यांच्या मते, भारतीय संघातील केएल राहुल हा एक असा फलंदाज आहे, जो मैदानाच्या चौफेर बाजूला शॉट मारून धावा वसूल करतो.
बांगर म्हणाले, “भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल देखील मैदानावर चारही बाजूला शॉट खेळतो. केएल राहुल जितका चांगला विकेट समोर खेळतो, तितकाच चांगला तो विकेटच्या मागेही खेळतो. एबी डीविलियर्स नंतर जर कोणता खेळाडू मैदानावर चारही बाजूला उत्कृष्ट फलंदाजी करत असेल तर तो केएल राहुल आहे. सर्वजण एबी डीविलियर्सला मिस्टर 360 डिग्री प्लेअर म्हणतात. पण मी केएल राहुलला भारताचा मिस्टर 360 डिग्री प्लेअर म्हणणे पसंत करेन.”
सध्या केएल राहुल भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. परंतु केएल राहुलला कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र आता ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत राहुलला संघात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ: धक्कादायक! श्रीलंकन खेळाडूंची बायो बबलचे नियम तोडून इंग्लंडच्या रस्त्यांवर मजा
बाजीगर! गोष्ट पाच तासांत तीन सुवर्ण जिंकणाऱ्या दीपिका कुमारीची
देशाचे दुर्दैव! आशियाई सुवर्णपदक विजेता खेळाडू विकतोय चहा