चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 हंगामातील आपला तिसरा सामना शनिवारी (8 एप्रिल) खेळणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसके संघ या सामन्यात बलाढ्य मुंबई इंडिन्सशी भिडणार आहे. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. पण त्याआधी सीएसकेची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. त्यांचा अष्टपैलू बेन स्टोक्स संदर्भातील ही बातमी आहे.
दिग्गज इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्स याला खरेदी करण्यासाठी सीएसकेने आयपीएल लिलावात 16.25 कोटी रुपये खर्च केले. पण हंगामातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला कमाल दाखवता आली नाही. स्टोक्सने या सामन्यांमध्ये अनुक्रमे 7 आणि 8 धावांची खेळी केली. यादरम्यान दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 18 धावा खर्च केल्या आणि एकही विकेट मिळवू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात स्टोक्सकडून चाहते आणि संघ व्यवस्थापनाला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा होती. मात्र, या सामन्याआधीच त्याच्या दुखापतीची बामती आली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शुक्रवारी (7 एप्रिल) वानखडे स्टेडियमवर सराव करताना स्टोक्सच्या टाचेत वेदना होत होत्या. अशात त्याला पुढचे 10 दिवस विश्रांतीचा सल्ला मिळाला आहे. अशात शनिवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यातून त्याला माघार घ्यावी लागू शकते. असे असले तरी, शनिवारी दुपारी सीएसकेच्या मेडिकल स्टाफकडून एकदा स्टोक्सची तपासणी केली जाईल. त्यानंतर संघ व्यवस्थापन आपला निर्णय गेईल. आयपीएल हंगाम सुरू होऊन अवघे काहीच दिवस झाले आहेत. अशातच बेन स्टोक्सची दुखापत नक्कीच सीएसकेसाठी चिंतेची बाब आहे. स्टोक्सला वेळेत विश्रांती दिली तर येत्या सामन्यांसाठी तो पुन्हा सज्ज राहू शकतो. दरम्यान, आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वीच स्टोक्स गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. (Ben Stokes injured before the match against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादचे पराभवाचे सत्र सुरूच, राहुलसेनेचा 5 विकेट्सने दणदणीत विजय; लखनऊ संघ गुणतालिकेतील टॉपर
महत्वाच्या सामन्याआधी मुंबईसाठी धोक्याची घंटा! प्रमुख खेळाडूच्या दुखापतीचे संकेत