वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू डॅरेन सॅमीने वर्णभेदावर बोट ठेवत बाउन्सर (उसळी) चेंडूबाबत तयार करण्यात आलेल्या नियमाबाबत मोठा दावा केला आहे. वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांच्या यशात अडथळा आणण्यासाठी बाउन्सर नियम लागू करण्यात आल्याचे सॅमीने सांगितले.
तो म्हणाला, “क्रिकेटला तेव्हा बाउन्सरशी काहीच समस्या नव्हती, जेव्हा गोऱ्या संघाचे खेळाडू तो बाउन्सर चेंडू टाकत असायचे. परंतु जेव्हा विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी यामध्ये प्रगती करत आपला प्रभाव निर्माण केला, तेव्हा बाउन्सरवर मर्यादा घालण्याचा नियम बनविण्यात आला.”
“क्रिकेटवर आधारित ‘फायर इन बेबीलॉन’ ही डॉक्यूमेंटरी पाहिल्यावर समजते, की जेफ थॉमसन आणि डेनिस लिली वेगवान गोलंदाजी करत होते आणि लोकांना जखमी करत होते. जेव्हा विंडीज संघाने आपला प्रभाव निर्माण करण्यास सुरुवात केली, तेव्हा लगेच बाउन्सरचा नियम येतो. आणि अशा पद्धतीने अनेक प्रकारचे नियम येऊ लागतात,” असे गुरूवारी (२५ जून) बोलताना सॅमीने म्हटले.
💬 "It has triggered a conversation that needs to be had across the cricketing fraternity."
West Indies all-rounder Daren Sammy expressed his thoughts on why the issue of racism needs to be discussed widely 📽️ pic.twitter.com/QaikzGXsK7
— ICC (@ICC) June 25, 2020
“तसेच, जितके मला समजत आहे, हे विंडीज संघाला रोखण्यासाठीच होते. जेव्हा एखादा कृष्णवर्णीय लोकांचा म्हणजेच विंडीज संघ यश मिळवत होता, तेव्हा हे त्यांच्या यशामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी होते,” असे त्याने पुढे बोलताना म्हटले.
“मी चूकीचा असू शकतो. परंतु मी हे पाहत आहे. आणि सिस्टीमने असे होऊ दिले नाही पाहिजे,” असेही सॅमी पुढे म्हणाला.
आयसीसीने १९९१ मध्ये ‘एका फलंदाजाला एका षटकात एकच बाउन्सर’ टाकण्याचा नियम लागू केला होता. या नियमपासून बाउन्सरवर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
विंडीजचा माजी वेगवान गोलंदाज कर्टली अँब्रॉसने (Curtly Ambrose) आपल्या आत्मकथेमध्ये लिहिले होते, “लोकांचा असा गैरसमज आहे, की विंडीजचे वेगवान गोलंदाज फलंदाजांना बाद करण्याच्या ऐवजी त्यांना जखमी करत मैदानाबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतात. खरंतर हे सत्य नाही. बाउन्सर वेगवान गोलंदाजांचे एकप्रकारे बाण आहेत.”
“जर मी तुम्हाला बाउन्सरमार्फत थोडे अस्वस्थ करू शकलो, तर यामुळे माझ्याकडे तुम्हाला बाद करण्याच्या अनेक संधी असतील. आणि असे नाही, की केवळ आम्हीच बाउन्सर चेंडू फेकले आहेत. खरंतर आमच्याही खेळाडूंना दुखापत झाली आहे. हा खेळाचा भाग आहे,” असेही त्याने आपल्या आत्मकथेमध्ये लिहिले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-चाळीशी पार केल्यावर करियरमध्ये पहिले वाहिले शतक झळकवणारा एकमेव फलंदाज, तर कुंबळेच्या नावावर
-सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्र्याही पडतील फिक्या…
-केवळ १० ओव्हरचा सामना; तरीही १९ वर्षीय खेळाडूने ठोकले खणखणीत शतक,शेवटच्या ओव्हरमध्ये तर..