अहमदाबाद येथे भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेला दुसरा टी२० सामना युवा भारतीय फलंदाज इशान किशन याच्यासाठी खूप विशेष राहिला. या सामन्यातून २२ वर्षीय इशानने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. याबरोबरच पदार्पणाच्या सामन्यात लाजवाब अर्धशतक झळकावून त्याने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर भारताचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहलने त्याची खास मुलाखत घेतली.
इशानची आक्रमक खेळी
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. इशानने ३२ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा ठोकून भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी केल्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी त्याला प्रथमच भारतीय संघात निवडले गेले होते.
चहलला दिली मुलाखत
आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावून सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या इशानची सामन्यानंतर युजवेंद्र चहलने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा एक व्हिडिओ भारतीय संघाच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला गेला. त्यामध्ये चहल इशानला विचारतो, “अर्धशतक झाल्यानंतर तू काही वेळ बॅट उंचावली नव्हती. तुला माहीत नव्हते अर्धशतक झाले आहे? की तू नर्वस होता?”
यावर उत्तर देताना इशान म्हणाला, “मी नर्वस नव्हतो. मला माहित नव्हते की, अर्धशतक झाले की नाही. विराटने ‘टॉप इनिंग’ म्हटल्यावर मला ते समजले. मी १-२ वेळा फक्त बॅट उंचावतो. मात्र, विराट भाई त्यावेळी मागून ओरडला. ओए हे तुझे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक आहे. मैदानाच्या चारही बाजूला सर्वांना बॅट दाखवून अभिवादन स्वीकार कर.”
https://www.instagram.com/p/CMbJo6egl9x/?utm_source=ig_web_button_share_sheet
भारतासाठी पदार्पण करणारा ८४ वा खेळाडू
या सामन्यातून भारतीय संघासाठी सुर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. इशान भारतासाठी टी२० क्रिकेट खेळणारा ८४ वा क्रिकेटपटू बनला. इशानने २०१६ मध्ये बांगलादेश येथे खेळल्या गेलेल्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारताचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेत भारत विश्वविजेता राहिलेला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भिडू तू बिनधास्त भीड’; सामन्यापूर्वी इशान किशनला रोहितने दिला होता मोलाचा सल्ला‘
हाच तो रस्ता..! बाद झाल्यानंतर कोहलीने ‘असा’ दाखवला स्टोक्सला पव्हेलियनचा मार्ग; पाहा व्हिडिओ
ब्रेकिंग! जसप्रीत बुमराह चढला बोहल्यावर, लग्नातील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ