कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणारा फलंदाज चेतेश्वर पुजारा आयपीएलमध्ये मागील ६ वर्षांपासून खेळला नाही. पुजाराला कसोटी स्पेशालिस्टही म्हटले जाते. त्यामुळे त्याच्यावर आयपीएल फ्रंचायझी बोली लावत नाही. पुजाराच्या आयपीएलमधील आकडेवारीबद्दल बोलायचं झालं तर तो काही खास नाही. वरच्या फळीतील फलंदाज म्हणून त्याचा स्ट्राईक रेट आणि सरासरी फार कमी आहे. पुजाराने आयपीएलमध्ये ३० सामन्यात २२ डाव खेळले आहेत. यादरम्यान त्याने २०.५२ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ही ५१ आहे.
पुजाराचा स्ट्राईक रेट हा १०० पेक्षाही कमी आहे. आणि कदाचित त्यामुळेच २०१४ नंतर तो आयपीएलमध्ये खेळलेला नाही. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून शेवटचा सामना ३ मार्च, २०१४ रोजी खेळला होता. तरीही त्याच्या नावावर आयपीएलमधील जबरदस्त विक्रम आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे दिग्गज फलंदाजही त्याच्या मागे आहेत.
चेतेश्वर पुजाराचा विक्रम
पुजाराची आयपीएलमधील सरासरी ही २०.५२ आहे. परंतु हे जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटेल की, तो कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक सरासरी ठेवणारा भारतीय फलंदाज आहे. पुजाराने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ११४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत, हा आयपीएलमधील एक विक्रम आहे. पुजारानंतर रिषभ पंतचा क्रमांक लागतो. त्याची राजस्थान रॉयल्स संघाविरुद्धची सरासरी हा ११० आहे. मोहम्मद युसूफचा गुजरात लायन्सविरुद्धची सरासरी ही ११० आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरची गुजरात लायन्सविरुद्धची सरासरीही ११० आहे.
डेव्हिड वॉर्नरचा आहे अव्वल क्रमांक
सनरायझर्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक सरासरी असणारा फलंदाज आहे. वॉर्नरची गुजरात लायन्सविरुद्धची सरासरी ही ३३६ आहे. ही सरासरी आयपीएलमधील इतर सर्व खेळाडूंपेक्षा खूप जास्त आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-किंग्ज इलेव्हन पंजाबचा हुकमी एक्का आहे हा क्रिकेटर; भारतीय मुलीशी केलाय साखरपुडा
-४७० मिनीटं पीचवर तळ ठोकून त्याने २४ वर्ष जुना विक्रम मोडला
-‘या’ फलंदाजाच्या प्रायवेट पार्टला २ वेळा लागला होता वसीम अक्रमचा चेंडू, माफी मागत शेअर केला व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
-क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज
-५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत