भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री इंग्लंविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामना सुरू होण्याआधी माध्यमांसोबत बोलताना व्यक्त झाले होते. त्यांनी बोलताना भारतीय संघ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे आणि याचे श्रेय कर्णधार विराट कोहली व सलामीवीर रोहित शर्माला जाते असे म्हटले होते.
विराट कोहलीला जाते भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीचे श्रेय
भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारत आणि इंग्लंमधील चौथा कसोटी सामना सुरू होण्याआधी माध्यमांबरोबर बोलताना स्वत:चे विचार मांडले होते. यावेळी बोलताना त्यांना भारतीय संघाच्या वेगवेगळ्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. येत्या टी२० विश्वचषकाच्या दृष्टीनेही त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता.
यावर रवी शास्त्री बोलताना म्हणाले, “क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाच्या सतत चांगल्या प्रदर्शनाचे श्रेय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माला (मर्यादित षटकांच्या संघाचा) जाते. भारतीय संघाचे वेगवेगळ्या स्वरुपात वेगवेगळे कर्णधार असावेत की नाही? याबाबत अगदी योग्य उत्तर निवडकर्ता किंवा क्रिकेट प्रसारक हेच देऊ शकतात”
रवी शास्त्रींनी पुढे बोलताना म्हटले, “हो. मी प्रशिक्षक आहे. माझ्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आहे, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आहे. एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय संघासाठी कर्णधार पुन्हा विराट कोहली आहे, उपकर्णधार रोहित शर्मा आहे आणि ते चांगली कामगिरी करत आहेत. जर तुम्ही भारतीय संघाचे प्रदर्शन पाहिले, मला सांगा या पाच वर्षांत कोणत्या दुसऱ्या संघाने सतत असे प्रदर्शन केले आहे. मग अंदाज कशाला बांधत बसायचे की, कोण भारताचा कर्णधार बनू शकतो किंवा नाही? संघ चांगले प्रदर्शन करत आहे आणि मी त्यांच्या प्रदर्शनाने खुश आहे.”
सध्या रवी शास्त्री भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. आगामी टी२० विश्वचषकानंतर नोव्हेंबरमध्ये रवी शास्त्री यांचा भारतीय संघासोबतचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपणार आहे. त्यानंतर संघासाठी नवीन प्रशिक्षक नियुक्त केला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या हमीदने स्विंगचा सामना करण्यासाठी केलं असं काही, कोहलीने थेट पंचांकडे केली तक्रार
इंग्लंडच्या हमीदने स्विंगचा सामना करण्यासाठी केलं असं काही, कोहलीने थेट पंचांकडे केली तक्रार