महान फिरकीपटू मुथ्थया मुरलीधरनने त्याच्या १९ वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत जगातील सर्वच फलंदाजांची झोप उडवली होती.
मुरलीधरनने फक्त विरोधी संघाच्याच नव्हे तर एकेकाळी त्याचा संघ सहकारी असलेल्या महान फलंदाज कुमार संगकाराचीही कित्येकदा झोप उडवली आहे.
याचा खुलासा खुद्द कुमार संगाकाराने व्हॉट द डक या कार्यक्रमात केला.
“श्रीलंकेसाठी दौऱ्यावर गेल्यावर मुरलीधरन माझा रुममेट असायचा. मुरलीला टीव्ही पाहणे खूप आवडते. मलाही आवडते पण मुरली मला कायम झोपेतून कार्टून पाहण्यासाठी उठवायचा. मी कित्येकदा झोपायची नाटके करायचो तरीही तो मला उठवून कार्टून पहायला लावायचा. त्यासाठी मला उठून कार्टून पहावे लागायचे.” असे संगाकारा म्हणाला.
या कार्यक्रमात पुढे मुरलीधरननेही संगाकाराची गुपिते उघडी केली.
“संगाकाराला विविध गोष्टी जमवण्याचा छंद आहे. त्यामध्ये मग घड्याळ असतील, व्हिस्की असेल विविध प्रकारची पेये असतील. पण त्याला मिळालेल्या ट्रॉफीज मात्र एकत्र करायला आवडत नाहीत. मिळालेल्या ट्रॉफीज संगाकारा एकतर फेकून देइल किंवा कोणालातरी देऊन टाकेल.त्याच्याकडे एकही ट्राॅफी नाही.” कुमार संगाकारा विषयी बोलताना मुरलीधरन म्हणाला.
या कार्यक्रमात या महान श्रीलंकन क्रिकेटपटूंनी त्यांच्या आयुष्यातील असे अनेक किस्से सांगितले.
या दोनही खेळाडूंनी त्यांच्या कारकिर्दित श्रीलंकन संघाला आपल्या कामगिरीने जागतीक क्रिकेटमध्ये वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते.
मुथ्थया मुरलीधरनने श्रीलंकेकडून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये ८०० तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५३४ बळी घेतले आहेत.
अाधुनिक क्रिकेटमधला उत्कृष्ट फलंदाज असे नाव कमवलेल्या कुमार संगाकाराने कसोटी क्रिकेटमध्ये १२४०० तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४२३४ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–बापरे! ५०० वर्ष जून्या शाळेच्या मैदानावर किंग कोहलीने केला सराव
–टीम इंडिया उद्या खेळणार ऐतिहासिक शंभरावा टी२० सामना