मुंबई । कोरोना विषाणूने पाकिस्तानमध्ये हाहाकार माजवला आहे. त्यातच नुकतेच कराची येथे शुक्रवारी विमान दुर्घटना झाली. तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे हे विमान कराचीच्या एका भागात जाऊन कोसळले. त्यात ९९ लोक प्रवास करत होते. त्यातील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर काही लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. या दुर्घटनेनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांने घटनास्थळी मध्यरात्री भेट दिली.
आफ्रिदीने मध्यरात्री घटनास्थळी जाऊन लोकांची विचारपूस केली. त्यानंतर ट्विटरवर त्याने ट्विट केले की, प्रत्येक वेळेस परिस्थिती सारखे नसते ज्या घरांमध्ये कालपर्यंत आनंद होता आज तिथं आज मृत्यूने थैमान घातले आहे. या घटनेनंतर पाकिस्तानच्या काही क्रिकेटपटूने देखील दुःख व्यक्त केले आहे. लॉकडाऊन पाकिस्तानमधील विमानसेवा बंद करण्यात आली होती. मागील आठवड्यातच विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली होती.
पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदी गेल्या अनेक दिवसांपासून वेगळ्या मुद्द्यांवर तो सडेतोड भाष्य करून चर्चेत राहिला आहे. कधी तो काश्मिरच्या गंभीर मुद्द्यांवर बोलतो तर कधी कोरोनाच्या संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीला धावून जातो. नुकतेच त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली होती. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंनी शाहिदच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली.