Sunday, January 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबो! केवढा तो कॉन्फिडन्स, बेबी एबीचा ‘नो लूक सिक्स’ झाला व्हायरल

बाबो! केवढा तो कॉन्फीडन्स, बेबी एबीचा 'नो लूक सिक्स' झाला व्हायरल

November 2, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Baby AB

Photo Courtesy : Mumbai Indians


सीएसए टी20 चॅलेंज ( CSA T20 Challenge) स्पर्धेत टायटन्स आणि नाईट्स या संघांमध्ये सामना झाला. ‘बेबी एबी ‘नावाने प्रसिद्ध असलेला डिवाल्ड ब्रेव्हिस याने या सामन्यात एक भीमपराक्रम केला. त्याने फक्त 57 चेंडूत तब्बल 162 धावा केल्या. त्याच्या या डावात त्याने 13 चौकार आणि 13 षटकार मारत धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. मात्र, या डावामध्ये त्याच्या बॅटमधून असा फटका बघायला मिळाला, ज्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणेच फिटले.

सीएसए टी20 चॅलेंज स्पर्धेत टायटन्स आणि नाईट्स या संघांमध्ये झालेल्या सामन्यात तूफान फटकेबाजी बघायला मिळाली. ए बी डिवीलीअर्स (AB De Villiers) याच्यासारखी शैली असल्याने प्रसिद्ध असलेला खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिस (Dewald Brevis) याने गोलंदाजांची दाणादाण उडवली. ब्रेव्हिसच्या तूफानी खेळीच्या मदतीने निर्धारीत 20 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर 271 धावांचा डोंगर रचला. या सामन्यातला ब्रेव्हिसने मारलेल्या एक षटकाराचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या सामन्यातल्या 11 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. यात त्याने गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर तो टोलावला. मात्र, तो चेंडू मारल्यानंतर त्याने चेंडूच्या दिशेने पाहिलही नाही. जणू त्याला आधीच माहिती होते की हा चेंडू षटकाराच जाणार. त्याच्या या आत्मविश्वासाला प्रचंड दाद दिली जात आहे. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

No look six by Dewald Brevis. pic.twitter.com/Crz9m6Ndtf

— Johns. (@CricCrazyJohns) November 1, 2022

या सामन्यात टायटन्सने दिलेल्या 271 धावांच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतलेला नाईट्स संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 230 धावा बनवू शकला. याच सामन्यात ब्रेव्हिसने एक अप्रतिम असा झेल देखील टिपला आहे. नाईट्सचे फलंदाज जलद गतीने धावा बनवतं होते. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाजाने षटकार मारण्याचा चांगला प्रयत्न केला, मात्र ब्रेव्हिसने चित्त्याच्या चपळाईने झेल घेतला. 19 वर्षीय या खेळाडूने ऑक्टोबर, 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-19 संघात पदार्पण केले. 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघात सामील करण्यात आले. आयपीएलमध्ये खेळलेल्या 7 सामन्यात 161 धावा केलेल्या. ज्यात त्याची उच्चांकी धावसंख्या 49 अशी आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास

शुभमन गिलची भारताच्या टी20 संघात निवड, पठ्ठ्याने 20 चेंडूत 98 धावा करत केले सेलिब्रेशन


Next Post
KL-Rahul-Hit-Run-Out

भारताची डोकेदुखी बनलेल्या लिटन दासचा राहुलने काढला काटा, व्हिडिओत पाहायला मिळाली चित्त्याची चपळाई

Photo Courtesy: Twitter/Wisden India

शाब्बास रे वाघांनो! थरारक सामन्यात बांगलादेशला धूळ चारत टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये

रोहितचंच चुकलंय! अजय जडेजांनी 'या' खेळाडूंवर फोडले दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पराभवाचे खापर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143