भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. धनश्री भारतीय संघाचे किंवा आरसीबी संघाचे सामने चालू असताना अनेकदा स्टेडियमवर दिसते. धनश्री या खेळाला फॉलो करते. इतकेच नव्हे तर तिने या खेळावर अनेक वेळा आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. धनश्री सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत राहते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. याच दरम्यान इंस्टाग्रामवर एका चाहत्याने तिला प्रश्न विचारला होता. त्यावर तिने खूप छान उत्तर दिले.
धोनीसाठी केले मन जिंकणारे वक्तव्य
धनश्री वर्माने ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनी यांच्याबद्दल चाहत्यांचे मन जिंकणारे वक्तव्य केले. धनश्री वर्माला एका चाहत्याने इंस्टाग्रामवर धोनी यांच्या बद्दल विचारले की, धोनी सरांविषयी सांगा. तर त्यावर धनश्रीने उत्तर दिले की, ‘लेजेंड, त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. ते खूप शांत आहेत आणि अनेक लोकांचे ते प्रेरणास्थान आहेत.’ धनश्रीच्या या उत्तराला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.
यूएईमध्ये झाली धोनी यांच्यासोबत भेट
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचा विवाह डिसेंबर 2020 मध्ये झाला. लग्नानंतर धनश्री आणि चहल हनीमूनसाठी यूएईमध्ये गेले होते. तेव्हा एमएस धोनी देखील आपल्या परिवारासोबत यूएई मध्ये आले होते. धनश्री आणि चहल यांनी या दरम्यान एमएस धोनी आणि त्यांची पत्नी साक्षी यांची भेट घेतली. आणि यांच्या सोबत रात्रीचे जेवणही केले.
धनश्री वर्मा ही एक डान्स कोरिओग्राफर आहे. तिचे डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालतात. धनश्री इंस्टाग्रामवर सतत सक्रिय असते. आणि इंस्टाग्रामवर ती आपल्या डान्सची व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांचे मनोरंजन करते. इतकेच नव्हे तर ती कधीकधी चहल सोबतही व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर धनश्रीचे खूप मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.
महत्वाच्या बातम्या:
दुर्दैवी शेफाली! चार धावांनी हुकले पदार्पणातील शतक, पण नावे केले हे विक्रम
न्यूझीलंड संघाचे तीन हुकमी एक्के, ज्यांच्यापासून भारताला अंतिम सामन्यात राहावे लागणार सावध