न्यूझीलंड संघाचे माजी खेळाडू डिक मोट्ज हे कसोटी क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघाकडून कसोटीत सर्वात प्रथम 100 विकेट्स घेणारे खेळाडू आहेत. तेही त्यांच्या शेवटच्या सामन्यात घेतल्या होत्या. त्यांचा एक दिवसापूर्वी (12 जानेवारी) जन्मदिवस होता. त्यांचा मृत्यू 29 एप्रिल 2007 साली झाला. त्यावेळी त्यांचे वय 67 वर्षे होते. न्यूझीलंड संघाचे वेगवान गोलंदाज आणि खालच्या फळीतील आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची कारकीर्द ही मैदानापेक्षा बाहेर जास्त रोमांचक आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर, चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
डिक मोट्ज यांनी न्यूझीलंड संघासाठी 1961 ते 1969 च्या दरम्यान क्रिकेट खेळले आहे. यामध्ये त्यांनी एकूण 32 कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधीत्व केले, ज्यामध्ये त्यांनी 100 विकेट्स प्राप्त केल्या. त्यापैकी न्यूझीलंड संघाने फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची संघाला काही खास मदत नाही झाली.
डिक मोट्ज यांना 1969 साली समजले की, ते जवळपास ते 18 महिने डिस्प्लेसड वर्टेबरा सोबत गोलंदाजी करत होते. त्यानंतर डिक मोट्ज यांनी लगेच निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांचे वय 29 वर्षे होते. डिक मोट्ज हे क्रिकेट व्यतिरिक्त रग्बी, टेनिस, बॅडमिंटन आणि गोल्फ सुद्धा खेळत होते. त्यांनी शाळा सोडल्यानंतर दोन वर्षापर्यंत न्यू ब्रायटन रग्बी संघासाठी फुल बैक म्हणून भाग घेतला होता.
डिक मोट्ज यांनी वयाच्या 29 वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर टॅक्सी ड्रायव्हर झाले. त्याचबरोबर एक सपोर्ट व्यवसाय सुद्धा सुरू केला होता. तसेच तिमारु येथे एक पब ही चालवत होते. आपल्या शेवटच्या काळात ते स्थूल झाले होते. त्यांचा 1997 साली न्यूझीलंड स्पोर्ट्स मध्ये हाॅल ऑफ़ फेम साठी समावेश केला होता.
त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांचे दोन वेळा लग्न झाले होते. त्यांचे पहिले लग्न क्रिकेटर लाॅरेटा टॉड सोबत झाले होते. ज्यांच्यासोबत 1987 साली घटस्फोट झाला. त्यांना यापासून एक मुलगा आणि दोन मुली होत्या. त्यांच्या मुलाची 1989 मध्ये हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जोसेफीन कोल सोबत दुसरे लग्न केली होते . डिक मोट्ज यांचे 2007 साली क्राइस्टचर्च येथे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल तेव्हा समजले जेव्हा त्यांचे माजी कर्णधार ग्राहम डाऊलिंग त्यांना भेटायला त्यांच्या गेले होते.
महत्वाच्या बातम्या:
हनुमा विहारीचा खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह! बाबुल सुप्रियोंच्या ट्विटला दिले भन्नाट उत्तर
चौथ्या कसोटी सामन्यात भारत मिळवणार विजय, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दर्शविला विश्वास
चौथ्या कसोटी सामन्यात भारत मिळवणार विजय, पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दर्शविला विश्वास