इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघामध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. भारतीय संघाने या मालिकेत अप्रतिम कामगिरी करत २-१ ची आघाडी घेतली होती. परंतु शेवटचा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. परिणामी भारतीय खेळाडूंनी घाबरून हा सामना खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे बीसीसीआय आणि ईसीबीने मिळून हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान शनिवारी (११ सप्टेंबर) ईसीबीने आयसीसीला या मालिकेचा अंतिम निकाल लावण्याबाबत आयसीसीला पत्र लिहिले आहे.
ओव्हल कसोटीदरम्यान भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका खाजगी सोहळ्याला हजेरी लावली होती. ज्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती, ज्यामुळे भारतीय खेळाडू भयभीत झाले होते आणि त्यांनी मैदानात उतरण्यास नकार दिला होता. यामुळे हा सामना रद्द करावा लागला.
दरम्यान क्रिकबजच्या वृत्तानुसार, शनिवारी (११ सप्टेंबर) ईसीबीने आयसीसीला पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी आयसीसीकडे या सामन्याच्या लवकरात लवकर निकाल लावण्याची मागणी केली आहे. क्रिकबजच्या वृतानुसार, ‘आयसीसी दोन्हीपैकी एक निर्णय घेऊ शकते. आयसीसीच्या कोरोना नियमानुसार, हा सामना जर कोरोनाच्या कारणामुळेच रद्द करण्यात आला असेल तर अशा परिस्थितीत भारतीय संघाला विजेता घोषित करण्यात येईल. मग भारतीय संघ ही मालिका २-१ ने आपल्या नावावर करेल. तसेच त्यानुसारच दोन्ही संघांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत गुण दिले जातील.’ (ECB ask icc to start adjudication process on cancelled test)
‘तर दुसरीकडे, जर आयसीसीच्या विवाद निवारण समितीला समजले की, इंग्लंड संघाला भारतीय खेळाडूंनी अंतिम कसोटी सामना खेळण्यास नकार दिल्याबद्दल वॉकओव्हर देण्यात आला होता. अशा परिस्थितीत इंग्लंड संघाला विजेता घोषित केले जाईल आणि मालिका २-२ ने बरोबरीत सुटेल.’
ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना रद्द झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जेव्हा पहिल्यांदाच विधान केले होते. त्यामध्ये इंग्लंड संघाने स्वतःला विजेता घोषित केले होते. मात्र, यानंतर त्यांनी ही गोष्ट प्रेस रिलीझमधून काढून टाकली होती. ईसीबीचे असे म्हणणे आहे की, ही मालिका २-२ ने बरोबरीत सुटली आहे आणि म्हणूनच त्यांनी अंतिम निर्णय आयसीसीवर सोडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमधून माघार घेतलेल्या मलान अन् बेयरस्टोच्या जागी ‘या’ खेळाडूंना संधी, एकटा MI चा जुना शिलेदार
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर जेम्स अँडरसन घेणार निवृत्ती? गोलंदाजाने स्व:त सांगितले सत्य