टी20 विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान छोटेखानी टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे खेळला गेला. या सामन्यातून इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर याने पुनरागमन केले. इंग्लंडने जबरदस्त सांघिक खेळ दाखवत हा सामना 8 धावांनी आपल्या नावे करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
England go 1-0 up in a thriller 🙌🏻
Watch the #AUSvENG series LIVE on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions) 📺
Scorecard: https://t.co/c0glce4S2J pic.twitter.com/w1RwObm9Ij
— ICC (@ICC) October 9, 2022
पर्थ येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय इंग्लंडसाठी सलामीला उतरलेला कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हेल्स यांनी चुकीचा ठरवला. वेस्ट इंडीजविरूद्ध शानदार गोलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्यांनी अक्षरशः फोडून काढले. दोघांनी षटकार चौकारांची बरसात करत, 11.2 षटकात 132 धावांची सलामी दिली. बटलरने 68 तर हेल्सने 84 धावा फटकावल्या. संघाचे इतर फलंदाज अपेक्षित फलंदाजी करून शकल्याने त्यांना निर्धारित 20 षटकात 6 बाद 208 धावा करण्यात यश आले. ऑस्ट्रेलियासाठी युवा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
प्रतिषटक 10 पेक्षा जास्त धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ग्रीन केवळ एका धावेवर तंबूत परतला. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श या जोडीने 71 धावांची भागीदारी केली. मार्श 36 व त्यानंतर कर्णधार फिंच 12 धावांवर माघारी परतले. मार्कस स्टॉयनिसने 15 चेंडूवर 35 धावा काढल्या. एका बाजूने गडी बाद होत असताना डेव्हिड वॉर्नर याने 44 चेंडूवर 73 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मात्र इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले. वेडने 21 धावा करत विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, अखेरच्या षटकात सॅम करनने टिचून गोलंदाजी करत संघाला आठ धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडसाठी मार्क वूडने तीन तर करन व टोप्लीने प्रत्येकी दोन बळी मिळवले. 84 धावांची वादळी खेळी करणाऱ्या ऍलेक्स हेल्सला सामनावीर पुरस्काराने गौरविले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: रांची वनडेत नाण्याचा कौल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन
सरावाचा श्रीगणेशा! ऑस्ट्रेलियाला पोहोचताच विराट-राहुलने गाळला घाम; तुम्हीही पाहा व्हिडिओ