भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. हा सामना भारतीय संघाने ३ षटक शिल्लक असतानाच ७ गडी राखून जिंकला. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. सामन्यानंतर इंग्लिश कर्णधाराने पराभवामागील कारण सांगत संघातील काही खेळाडूंवर पराभवाचे खापर फोडलं आहे.
इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात इशान किशन आणि विराट कोहली यांच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाने सहजरित्या विजय मिळवला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार ऑएन मॉर्गन निराश होऊन वरच्या फळीला पराभवासाठी जबाबदार ठरवले आहे.
तो म्हणाला की, “आमच्यासाठी निराशाजनक बाब ही होती की, आम्ही विपक्षी गोलंदाजांवर पहिल्या १० षटकात आक्रमण नाही करू शकलो. वरच्या फळीतील २ फलंदाज नेहमी प्रयत्नात असतात की, आक्रमक खेळी करावी आणि याच प्रक्रियेसोबत मैदानात उतरावे. मात्र आमच्या सलामीवारांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.”
धावांचा पाठलाग करणे नेहमी फायदेशीर असते
“आम्ही त्या लक्ष्यच्या आसपास होतो, जो आम्हाला हवा होता. परंतु भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत आम्हाला कमी धावांवर थांबवले. त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच बॅकफूटवर ठेवले होते. त्यांनी गोलंदाजीमध्ये केले मिश्रण हे आमच्या फलंदाजांसाठी आव्हानात्मक होते. त्यांनी आम्हाला शॉट खेळण्यासाठी गतीच दिली नाही. भारतीय गोलंदाजांनी संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. मला आनंद आहे की, आम्ही या खेळपट्टीवर खेळलो. परंतु आमच्या खेळण्याचा पद्धतीने मी थोडा दु:खी आहे. धावांचा पाठलाग करणे नेहमी फायदेशीर असते,” असे पुढे मॉर्गनने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘वडापाव खूपच महत्वाचा,’ सामन्यादरम्यान रोहितचा लपूनछपून नाश्ता; नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया
आऊट ऑफ फाॅर्म विराटने सामन्याआधी लावला होता एबीला फोन, पाहा काय दिला होता सल्ला
सामनावीर पुरस्कार स्विकारताना इशान झाला भावूक, ‘या’ खास व्यक्तीला अवॉर्ड केला समर्पित