नवी दिल्ली। शनिवार म्हणजेच २५ जुलै हा दिवस क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. तब्बल २०० वर्षांपूर्वी इंग्लंडचे डावखुरे फलंदाज विल्यम वार्ड यांनी २५ जुलै १८२० रोजी क्रिकेटमधील पहिले द्विशतक ठोकत इतिहास रचला होता. हा विक्रम तब्बल ५६ वर्षांपर्यंत अबाधित राहिला होता. त्यानंतर १८७६ मध्ये डब्ल्यूजी ग्रेस (WG Grace) यांनी तब्बल ३४४ धावांची खेळी करत वार्ड यांचा विक्रम मोडला. वार्ड यांनी क्रिकेटपटूव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात अनेक भूमिकाही निभावल्या.
वार्ड (William Ward) यांनी लॉर्ड्स येथे एमसीसी संघाकडून खेळताना नोरफॉक संघाविरुद्ध हे द्विशतक ठोकले होते. हे क्रिकेट इतिहासातील पहिले द्विशतक होते.
Today in 1820, exactly 200 years ago, William Ward batting for the MCC against Norfolk at the Lord's Cricket Ground in London, recorded the first-ever double century in an important cricket match! He made 278, which was then a record by a batsman until WG Grace made 344 in 1876.
— Mohandas Menon (@mohanstatsman) July 25, 2020
विशेष म्हणजे वार्ड हे एक गुंतवणूकदारही होते. १८१७मध्ये त्यांना बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून निवडले होते.
https://twitter.com/mohsinstats/status/1286675529140260864
वार्ड यांना परकीय चलन तज्ञ म्हणूनही ओळखले जात होते. १८२६ मध्ये ते लंडनचे संसद सदस्यही होते. त्याचबरोबर वार्ड १८३० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची चौकशी करणार्या समितीचे अध्यक्षही होते. २५ जुलैचा दिवस हा खेळासाठी अभिमानास्पद आहे. आणि विविध क्रिकेट संस्था क्रीडा इतिहासाच्या पहिल्या द्विशतकाच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त वार्ड यांचे स्मरण करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-आयपीएल २०२० चे सामने होऊ शकतात युएईच्या या ३ मैदानांवर
-‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू; बाथरूममध्ये रडायचा तासंतास
-आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने धावा करणारे ५ फलंदाज ….
ट्रेंडिंग लेख-
-निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ३- गब्बरची कसोटी क्रिकेटमध्ये जबर एन्ट्री
-अगदी सौरव तिवारीपासून ‘या’ ६ कर्णधारांच्या अंडर खेळलाय धोनी