देशातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आगीसारखा भडकत चालला आहे आणि यामुळे ट्विटरवर दररोज नवीन हॅशटॅग ट्रेंड होतायेत. बुधवारी (३ फेब्रुवारी) रात्री भारतीय क्रिकेटपटूंनी ‘इंडिया टूगेदर’ हा हॅशटॅग चालवत एकापाठोपाठ एक ट्विट केले. देशाबाहेरील व्यक्तीने भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नये, असा संदेश या ट्विट्समधून देण्यात आला. इतर भारतीय खेळाडूंप्रमाणेच भारताचा कसोटीपटू व सध्या अनेकांच्या कौतुकास पात्र ठरत असलेल्या अजिंक्य रहाणेने देखील याच आशयाचे ट्विट केले. ज्यावर चाहत्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले.
रहाणेने केले असे ट्विट
बुधवारी सायंकाळी भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी ‘इंडिया टुगेदर’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत अप्रत्यक्षरीत्या शेतकरी आंदोलनाच्या वादात उडी घेतली. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या क्रिकेटपटूंसह अजिंक्य रहाणेने देखील ट्विट केले.
रहाणेने लिहिले, ‘असा कोणताही मुद्दा नाही जो आपण जो आपण एकत्र आल्यास मिटू शकत नाही. आपल्याला एकत्र राहून आपला अंतर्गत वाद मिटवण्यासाठी काम केले पाहिजे. #इंडिया टुगेदर’
There’s no issue that cannot be resolved if we stand together as one. Let’s remain united and work towards resolving our internal issues #IndiaTogether
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) February 3, 2021
रहाणेने हे ट्विट करताना कमेंट बंद केल्या आहेत. मात्र, त्यानंतरही चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले.
एका चाहत्याने लिहिले, ‘तुम्ही राजकारणी आहात की आपले कुटुंब चालण्यासाठी खोट्याची साथ देताय’
Are you a politician or does lying just run in your family?#SachinTendulkar – Viratkholi – Ajinkya Rahane – RohitSharma
– AnilKumble— Sayyid Ubaid Anwar Shah (@SayyidUbaidShah) February 4, 2021
दुसऱ्या एका चाहत्याने ट्विट करताना लिहिले, ‘भारतीय शेतकरी विरुद्ध भारत सरकार सामना सुरू झाला आहे. ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अजिंक्य रहाणे तसेच रोहित शर्मा हे सर्व भारत सरकारसाठी फलंदाजी करत आहेत.’
Indian farmer vs indian govt. match #SachinTendulkar #ViratKohli #RohitSharma #AjinkyaRahane #AnilKumble #SureshRaina is batting for the govt.
— Abdul azeem🇮🇳 (@RealAbdulazeem1) February 4, 2021
एका चाहत्याने रहाणेला अनफॉलो करत लिहिले, ‘या सर्व खोटारड्या लोकांना अनफॉलो करत आहोत.. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे तुम्हाला फरक पडत नसेल, मात्र आम्हाला पडतो. कारण, आम्ही शेतकऱ्यांची औलाद आहोत.’
Unfollowed so called fake celebrities…@ImRo45 @ajinkyarahane88
तुम्हाला फरक पडत नसेल, पण आम्हाला पडतो.
कारण मी शेतकऱ्याची औलाद आहे…#FarmersProstest— सोनू बालगुडे पाटील🚩 (@ImLB17) February 4, 2021
रिहानाने उचलला होता शेतकरी आंदोलनाचा मुद्दा
अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने मंगळवारी (२ फेब्रुवारी) रोजी जवळपास तीन महिने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मुद्दाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींनी त्याला समर्थन दिले. आता त्याला उत्तर म्हणून भारतातील सेलिब्रिटींनी हा ट्रेंड केला. मात्र, लोकांची नाराजी पाहता याचा उलट परिणाम झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, भारतातील सेलिब्रिटींनी या आधी या मुद्द्यावर काहीही भाष्य केले नव्हते.
रहाणेने केली आहे शेतकऱ्यांची मदत
दरम्यान हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, अजिंक्यने या पूर्वी अनेक वेळा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ सोशलमीडिया वर पोस्ट केलेल्या आहेत. तसेच त्याने मागील वर्षी महेंद्रा ग्रुपसोबत ‘मेरा किसान’ ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत अजिंक्य शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात मदत करत असतो. अल्पावधीतच अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा देखील झालेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल एकत्र खेळतो, परंतु परदेशी खेळाडूंना आमच्या सर्व युक्त्या सांगत नाही- अजिंक्य रहाणे
INDvsENG : ‘असा’ आहे चेन्नई कसोटीचा इतिहास; पाहा टीम इंडियाने जिंकले किती सामने