पुणे: एक डिसेंबर, कर्नल भगत हायस्कूल, पीसीएमसी स्कूल, लॉयला आणि सेंट पॅट्रिक स्कूल यांनी फादर शॉच मेमोरियल तिसऱ्या आंतरशालेय हॉकी स्पर्धेतील चौदा वर्षांखालील विभागात उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर-पिंपरी येथे आयोजित करण्यात आली आहे.
एक्स लॉयला स्टुडंट्स नेटवर्क (ईएल एएन) आणि लॉयला प्रशाला, पुणे यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत शहरातील डझनभर संघांना आकर्षित केले आहे आणि त्या अनुक्रमे १२,१४ व १७ वर्षाखालील गटात आयोजित करण्यात आल्या आहेत. कर्नल भगत हायस्कूलने अंतिम चार संघांमध्ये प्रवेश करण्यासाठी लोकमान्य टिळक शाळेचा ३-० असा सहज पराभव केला. ईशान परदेशी याने दोन गोल करीत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. अयान शेख यांनी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली.
याआधीच्या सामन्यामध्ये कर्नल भगत हायस्कूलने मॉडर्न प्रशाला, शिवाजीनगर विरुद्ध शूट-आऊटद्वारे 4-3 असा रोमांचकारी विजय मिळवला. पूर्ण वेळेअखेर दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत होते. कार्तिक पिल्ले (७व्या) याने कर्नल भगत हायस्कूलला आघाडी मिळवून दिली. श्रेयस मुसळे (३९वे आणि ५८वे) याने मॉडर्नसाठी गोल करीत संघास आघाडी मिळवून दिली. १-२ ने पिछाडीवर, कर्नल भगत हायस्कूलने चैतन्य आठवले (५९व्या) याने पेनल्टी कॉर्नरद्वारा केलेल्या गोलाच्या जोरावर २-२ अशी बरोबरी साधली आणि गेम ‘शूट-आउट’मध्ये नेला. त्यानंतरच्या शूटआऊटमध्ये कर्नल भगत हायस्कूलसाठी कार्तिक आणि अर्श शेख यांनी गोल केले, तर स्वयंभू पारधे याने मॉडर्नसाठी एकमेव गोल केला.
श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायणगाव संघाने लॉयला हायस्कूल, पाषाण संघाला पुढे चाल दिली. शेवटच्या सामन्यात, पीसीएमसी स्कूलने प्रिन्स पटियाल (१०वा, १८वा, ४९वा) याच्या तीन गोलच्या जोरावर मुक्ताई मराठी शाळेचा ५-० असा दणदणीत पराभव केला. रोहन मस्के (४९वे) आणि अली शेख (५६ वे) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली. उपांत्य फेरी पूर्ण करताना सेंट पॅट्रिक्सने संत तुकाराम प्रशालेवर ७-० असा विजय मिळवला. विजयी संघाकडून शौर्य मेंगे (२०वे, ३२वे, ४३वे, ५०वे) याने गोलांचा चौकार मारला. किरण खडका ( पाचवा), जेम्स निट्टा (१४वा) आणि संदेश कुदळे (३०वा) यांनी प्रत्येकी एक गोल केला. (Father Schoch Memorial Inter-School Hockey Tournament 2023. St. Patrick’s, Loyola, PCMC advance to semifinals)
उपांत्य फेरीचे सामने असे होणार आहेत
पीसीएमसी विरुद्ध कर्नल भगत हायस्कूल
सेंट पॅट्रिक्स स्कूल विरुद्ध लॉयला
निकाल –
१४ वर्षाखालील-कर्नल भगत हायस्कूल: ३ (ईशान परदेशी (पहिले व ३५वे; अयान शेख तिसरे) वि.वि.लोकमान्य टिळक स्कूल ०
पीसीएमसी – ५ (प्रिन्स पटियाल १०वे, १८वे, ४९वे; रोहन मस्के ४९वे; अली शेख ५६वे) वइ.वि मुक्ताई मराठी शाळा: मध्यंतर २-०
क्यूएफ सेंट पॅट्रिक्स एचएस: 7 (किरण खडका ५वे, जेम्स निट्टा १४वे, शौर्य मेंगे २०वे, ३२वे, ४३वे, ५०वे, संदेश कुदळे ३०वे) संत तुकाराम प्रशाला, लोहेगाव: . पूर्वार्ध ४-०
पहिली फेरी- 14 वर्षांखालील: कर्नल भगत हायस्कूल: ४ (कार्तिक पिल्ले ७वे, चैतन्य आठवले ५९ वे, कार्तिक पिल्ले, अर्श शेख) वि.वि मॉडर्न , शिवाजीनगर: २ (श्रेयस मुसळे 39वे, 58वे; पारधे ). पूर्वार्ध: 1-0
श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल, नारायणगाव: ४ (वरद कोल्हे ७वे, समर्थ वारुळे १७वे, ३३वे , ५८वे) वि.वि एम सी ई एस आझम कॅम्पस: पूर्वार्ध २-०
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपवर पाय ठेण्याची कुठलीच खंत नाही! मिचेल मार्श म्हणाला, ‘…पुन्हा करू शकतो’