वनडे विश्वचषक 2023 ची साखळी फेरी समाप्त झाली आहे. त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड हे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. या संपूर्ण साखळी फेरी दरम्यान काही असे खेळाडू राहिले ज्यांच्याकडून संघांना व चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ते त्या अपेक्षांवर खरे उतरू शकले नाहीत. अशाच खेळाडूंची फ्लॉप इलेव्हन आपण पाहूया.
वनडे विश्वचषक स्पर्धेची फ्लॉप इलेव्हन-
टेंबा बवुमा- दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बवुमा या विश्वचषकात येण्याआधी चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र, स्पर्धेत त्याला अपेक्षित कामगिरी करता आलीच नाही. त्याने स्पर्धेत सात सामने खेळताना केवळ 145 धावा केल्या. यामध्ये तो एकही अर्धशतक झळकावू शकला नाही.
कुसल मेंडिस- विश्वचषकाच्या सुरुवातीला श्रीलंका संघाचा उपकर्णधार कुसल मेंडिस याने पहिल्या दोन सामन्यात जोरदार फटकेबाजी करत एक शतक व एक अर्धशतक ठोकले होते. मात्र, नियमित कर्णधार शनाका स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. त्यानंतर पुढील सात सामन्यांमध्ये तो फक्त 97 धावा करू शकला. त्याने स्पर्धेत केवळ 294 धावा केल्या.
बाबर आझम- जगातील अव्वल पाच फलंदाजांपैकी एक असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या स्पर्धेत पूर्णतः अपयशी ठरला. पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नाही. तर स्वतः बाबर यांनी देखील 9 सामन्यांमध्ये केवळ 320 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी केवळ 40 ची होती.
मेहदी हसन मिराज- बांगलादेशचा भविष्यातील कर्णधार म्हणून लक्ष असलेला मेहदी हसन मिरज गोलंदाजी व फलंदाजी आपली ओळख बनवण्यात अपयशी ठरला. त्याने स्पर्धेत केवळ 201 धावा बनवल्या. तसेच गोलंदाजीत तो फक्त 10 बळी घेऊ शकला.
टॉम लॅथम- न्यूझीलंड संघाचा उपकर्णधार व तब्बल सहा सामन्यात नेतृत्वाची संधी मिळालेला टॉम लॅथम फलंदाज म्हणून आपली छाप पडण्यात काहीसा अपयशी ठरला. त्याला दोन अर्धशतकांसह नऊ सामन्यात केवळ 155 धावा करता आल्या.
जोस बटलर- आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अफाट अनुभव असलेल्या जोस बटलर याला या विश्वचषकात फलंदाज व कर्णधार अशा दुहेरी भूमिकेत अपयश आले. इंग्लंड संघ स्पर्धेत केवळ तीन विजय मिळवू शकला. तर, फलंदाजी तो केवळ 15 च्या मामुली सरासरीने 138 धावा करण्यात यशस्वी ठरला.
शादाब खान- या विश्वचषकात पाकिस्तानचा उपकर्णधार असलेल्या शादाब खान याचे अपयश अगदी ठळकपणे दिसून आले. स्पर्धेत एक वेळ त्याला अंतिम अकरा मधून वगळले देखील गेले होते. त्याच्या नावे केवळ दोन बळी जमा झाले. तर फलंदाजीतही केवळ 121 धावा त्याच्या बॅटमधून आल्या.
मोहम्मद नबी- या विश्वचषकाला अफगाणिस्तान संघाची कामगिरी स्वप्नवत राहिली. त्यांनी तब्बल चार सामने जिंकण्याचा पराक्रम केला. मात्र, संघाचा अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबी हा फारसे योगदान देऊ शकला नाही. त्याने केवळ 55 धावा केल्या. तर गोलंदाजीतही फक्त 8 बळी त्याच्या नावे जमा झाले.
महिश थिक्षणा- श्रीलंका संघाचा प्रमुख फिरकीपटू महिश थिक्षणा हा आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. वनिंदू हसरंगा याच्या गैरहजेरी त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आठ सामने खेळताना तो केवळ सहा बळी मिळवू शकला.
हारिस रौफ- पाकिस्तान संघाचा हुकमी एक्का असलेला वेगवान गोलंदाज हारिस रौफ हा या विश्वचषकात 16 बळी मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्याचबरोबर तो विश्वचषकातील सर्वात महागडा गोलंदाजही बनला. मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही.
मुस्तफिझूर रहमान- बांगलादेश संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेला रहमान या विश्वचषकात 8 सामने खेळला. यामध्ये त्याच्या नावे फक्त पाच बळी जमा झाले.
(Flop XI Of 2023 ODI World Cup Bavuma Buttler There)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशी परतताच पाकिस्तान संघाला जोरदार धक्का! वर्ल्डकपमधील सुमार कामगिरीनंतर आला पहिला राजीनामा
गुरबाजने केलेली अहमदाबादच्या गरीब लोकांची मदत; पाहून शशी थरूरही म्हणाले, ‘हृदयासारखं तुझं करिअरही…’