येत्या १३ जुलै पासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका रंगणार आहेत. या मालिकेसाठी बीसीसीआयने अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंचा संघ पाठवला आहे. तसेच या संघाचे कर्णधारपद शिखर धवनच्या हाती देण्यात आले आहे. युवा खेळाडूंनी भरलेल्या या संघाचे ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूने तोंडभरून कौतुक केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंका संघाचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला द्वितीय श्रेणीचा संघ म्हणून संबोधित केले होते. तसेच असेही म्हटले होते की, द्वितीय श्रेणीच्या संघासोबत खेळणे हा श्रीलंकन क्रिकेटचा अपमान आहे. या विधानानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. परंतु आता माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
हॉग यांनी म्हटले की, “श्रीलंका दौऱ्यावर गेलेला संघ जगातील कुठ्ल्याही संघाला बरोबरीची लढत देऊ शकतो.”(Former austrelian Cricketer Brad hogg said India squad in srilanka can challenge all full strength team)
ब्रॅड हॉग यांनी ट्विट करत म्हटले की, “श्रीलंकेत उपस्थित असलेल्या भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, मी असा मुळीच विचार करू शकत नाही की, कोणी त्यांच्याबद्दल तक्रार करेल. हा एक असा संघ आहे, जो यावेळी बलाढ्य संघांना बरोबरीची लढत देऊ शकतो.”
Looking at the India squad in Sri Lanka, I don't think the hosts can complain. It's a line up that would challenge all full strength teams at the moment. #INDvSL
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 7, 2021
तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये हॉग यांनी या मालिकेत कुठला संघ जिंकेल याची भविष्यवाणी केली आहे. त्यांनी लिहिले की, “श्रीलंका संघासमोर काही समस्या आहेत. मात्र भारतीय संघ या दोन्ही मालिकेत विजय मिळवणार. संघातील खेळाडूंचे मन स्थिर ठेवण्यासाठी राहुल द्रविड आहेत.”
Sri Lanka are having a few issues. India will win both series. Rahul Dravid to disciplined to not have the squad in the right frame of mind. #INDvSL https://t.co/ewM4bMNu9w
— Brad Hogg (@Brad_Hogg) July 7, 2021
काय म्हणाले होते अर्जुन रणतुंगा?
रणतुंगा यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “हा दुसऱ्या श्रेणीचा भारतीय संघ आहे आणि त्यांचे इथे येणे आमच्या क्रिकेटचा अपमान आहे. टेलिव्हिजन मार्केटिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यासोबत खेळण्याचे मान्य केल्याबद्दल मी सध्याच्या प्रशासनाला दोष देतो. भारताने आपला बलाढ्य संघ इंग्लंडला रवाना केला आहे. तर कमकुवत संघ इथे पाठवला आहे. मी यासाठी बोर्डला दोषी ठरवतो. ”
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडवरुन परतीचा प्रवास करताना श्रीलंका संघाची उडाली झोप, अचानक विमानाचे इंधन संपले अन्…
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला