इंग्लंडचा माजी फलंदाज गॅरी बॅलन्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय बॅलन्स दोन महिन्यांपूर्वी त्याचा मूळ देश असलेल्या झिम्बाब्वेमध्ये परतला होता. त्याने त्यांच्यासाठी एक कसोटी, एक टी20 आणि पाच वनडे सामने खेळले. बॅलेन्सने झिम्बाब्वेसाठी खेळलेल्या एकमेव कसोटीत नाबाद 137 धावांची खेळी केली होती.
Gary Ballance has announced his retirement from all forms of professional cricket with immediate effect.
The former England batter made his debut for Zimbabwe earlier this year against Ireland. pic.twitter.com/mHiVwubVb9
— Wisden (@WisdenCricket) April 19, 2023
बॅलेन्सच्या वतीने प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बर्याच विचारांनंतर मी सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून त्वरित प्रभावाने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याला संधी देण्यासाठी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे मी आभार मानतो.’
बॅलन्स याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात इंग्लंडसाठी केली होती. 2014 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने इंग्लंडच्या कसोटी संघात आपली जागा निश्चित केलेली. भारताविरुद्ध त्याने शतकी खेळी केली होती.
बॅलन्स याने आपल्या कारकिर्दीत 24 कसोटी सामने खेळताना 1653 धावा केल्या. यामध्ये पाच शतकांचा समावेश होता. तर वनडे कारकीर्दीत त्याच्या बॅटमधून 454 धावा आल्या. त्याला आपल्या कारकिर्दीत केवळ एक आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने 30 धावा केल्या.
(Former English Zimbabwe Cricketer Gary Ballance Announced Retirement From All Forms Of Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लखनऊविरुद्धच्या सामन्यापूर्वीच चहलचा मोठा खुलासा! म्हणाला, आम्ही ‘या’ नियमाचा सर्वाधिक फायदा उचलला
अखेर 14 वर्षांचा वनवास संपला! अर्जुनने घडवून आणली क्रिकेट इतिहासातील अतिदुर्मिळ घटना