कोरोना वायरसचा प्रादुर्भाव हा संपूर्ण जगभरात जाणवत असून, क्रीडा क्षेत्रही त्याला अपवाद नाही. मागील वर्षभरात अनेक खेळाडूंना कोरोना झाला असून ही गंभीर बाब बनली आहे. याच दरम्यान बातमी समोर येत आहे की पाकिस्तानची माजी क्रिकेट कर्णधार सना मिर ही देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कायदे आझम ट्रॉफी या टूर्नामेंट मधील अंतिम सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या मिरची कोरोना चाचणी केली असता ,ती पॉझिटिव्ह आढळली आहे. मिर सोबत समालोचन करत असलेल्या इतर सहकाऱ्यांनी देखील आपली कोरोना चाचणी केलेली आहे. कायदे आझम ट्रॉफी मधील अंतिम सामना शुक्रवारी सेंट्रल पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा या संघामध्ये सुरु झाला होता.
पाकिस्तान कडून 15 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या मिरने मागील वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. मिरने आपल्या करियर मध्ये एकूण 226 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले असून ,2009 ते 2017 पर्यंत 137 सामन्यात पाकिस्तानचे कर्णधारपद भूषविले आहे. मिरच्या नेतृत्वात पाकिस्तानने 2010 व 2014 आशियाई खेळात सुवर्णपदक जिंकले आहे. निवृत्तीनंतर मिर समालोचन क्षेत्रात वळली असून पाकिस्तान सुपर लीग मध्येदेखील तिने समालोचन केलेले आहे. मिरच्या चाहत्यांना आशा असेल की ती लवकरच कोरोनातून बरी होईल.
महत्वाच्या बातम्या:
– ब्रेकिंग! केएल राहुल दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
– बापरे बाप!! भारतीय खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमधील तब्बल २० जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह
– केन विलियम्सनची झुंजार दीडशतकी खेळी, या मोठ्या विक्रमाला घातली गवसणी