पाकिस्तान संघाने गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या संघाने बलाढ्य दक्षिण आफ्रिका संघाला त्यांच्यात देशात जाऊन वनडे आणि टी -२० मालिकेत धूळ चारली होती. तसेच झिम्बाब्वे संघाला देखील पराभूत केले होते.या संघातील गोलंदाज आणि फलंदाज उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. परंतु माजी पाकिस्तानी गोलंदाज संघाच्या निवडीवर फारसा प्रभावित झाला नाही. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर संघाच्या निवडीवर फारसा प्रभावित झाला नाही. आधुनिक क्रिकेटच्या आवश्यकता न पाळल्याबद्दल त्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाला फटकारले आहे.
पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेच असतो. त्याने एका टिव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “जोपर्यंत संघ जिंकत आहे, तोपर्यंत कोणताही अन्याय होणार नाही. जर एखादा खेळाडूही बाद झाला असेल तर ते ठीक आहे. ती एक मालिका सुरू होती, म्हणून त्यावेळी टीका करणे आवश्यक नव्हते. आम्ही त्यांचे समर्थन करतो जेणेकरुन ते योग्य निर्णय घेऊ शकतील. आता मालिका संपली आहे, म्हणून मी म्हणतो की या प्रकारचे क्रिकेट खेळू नका, हे मान्य नाही. जर हे असेच सुरू राहिले तर आपला गेम लवकरच घसरेल.”
मोहम्मद रिजवान बद्दल व्यक्त केली निराशा….
तसेच त्याने पुढे यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानवर टीका करताना म्हटले आहे की, “मोहम्मद रिजवानचे काय करावे हे तुम्हाला माहीतच नाही आणि मोहम्मद रिजवानला ही याचा विचार करावा लागेल. हा तुमच्या काकाचा संघ नाही की, तुम्ही प्रत्येक फॉरमॅटमध्ये सलामी फलंदाजी कराल. तुम्हाला संघाने जी भूमिका दिली आहे, तीच भूमिका तुम्हाला पार पाडावी लागणार आहे. एक साधी सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही हे करण्यास सक्षम नसाल तर,सरळ मार्गाने तुम्ही संघाबाहेर जाऊ शकता. त्यांची निवड करूच नका.”
मोहम्मद रिझवानने झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना टी२० मालिकेत सलामीला फलंदाजी करताना ३ सामन्यांत १८७ धावा केल्या. तक कसोटीत मधल्या फळीत त्याला २ सामन्यांत केवळ ६६ धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठ्या मनाचा खेळाडू! सीएसकेच्या ‘या’ खेळाडूने केलेल्या मदतीबद्दल सोनू सूदने मानले आभार
भारतीय संघाला मिळाला मोठा दिलासा, इंग्लंड दौऱ्यापूर्वी संघातील ‘हे’ तीन खेळाडू पूर्णपणे फिट