इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात शनिवार (१६ एप्रिल) पर्यंत २७ सामने खेळून झाले आहेत. या हंगामात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. स्पर्धेदरम्यान अनेक युवा खेळाडू चमकले आहेत. त्याचबरोबर यादरम्यान अनेक अनुभवी खेळाडूंनी आपला दम दाखवत शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांनी भारतीय संघात पुनरागमनासाठी दावेदारीही ठोकली आहे. याचवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्यामुळे त्याचदृष्टीने पुढील काही महिन्यांत काही महत्त्वाच्या मालिकाही होणार आहेत. यामुळे असेही काही खेळाडू आहेत, जे भारतीय संघात पुनरागमन करू शकतात. असे कोणते ५ खेळाडू आहेत, याबद्दल आपण या लेखात जाणून घेऊ.
१. कुलदीप यादव – मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आयपीएल २०२२ साठी त्याला दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या संघात सामील केले आणि त्याला खेळण्याची संधीही दिली. या विश्वासाला कुलदीपने सार्थ ठरवले आणि ५ सामन्यांत त्याने ११ विकेट्सही घेतल्या. आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची ही कामगिरी पाहाता त्याला भारतीय संघात संधी मिळू शकते.
२. दिनेश कार्तिक – दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) आत्तापर्यंत आयपीएल २०२२मध्ये ६ सामन्यांत १९७ च्या सरासरीने आणि जवळपास २०९ च्या स्ट्राईकरेटने १९७ धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत नाबाद राहिला आहे. त्याने या सहा सामन्यांत अनुक्रमे नाबाद ३२ धावा (१४ चेंडू), नाबाद १४ धावा (७ चेंडू), नाबाद ४४ धावा (२३ चेंडू), नाबाद ७ धावा (२ चेंडू), ३४ धावा (१४ चेंडू), नाबाद ६६ धावा (३४ चेंडू) अशा धावसंख्या उभारली आहे. त्याची ही कामगिरी पाहाता त्याच्याकडे आता एक चांगला फिनिशर म्हणून पाहिले जात आहे. कार्तिकने भारतीय संघात (Team India) स्थान मिळवण्यासाठी दावेदारीही ठोकली आहे.
३. उमेश यादव – मागील काही काळापासून भारतीय संघातून बाहेर असलेला उमेश यादव (Umesh Yadav) देखील आयपीएल २०२२ मध्ये शानदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने आत्तापर्यंत ६ सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट ६.७ एवढा आहे. त्याने डावाच्या सुरुवातीच्या षटकांमध्येच विकेट्स घेत त्याची क्षमता दाखवली आहे. त्यामुळे तो देखील भारतीय संघात स्थान मिळवू शकतो.
४. हार्दिक पंड्या – आयपीएल २०२२ पासून (IPL 2022) नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्सचे हार्दिक पंड्या (Hardik Pandya) नेतृत्व करत आहे. त्याने नेतृत्व करताना शानदार कामगिरीही केली आहे. तसेच तो अष्टपैलू म्हणूनही यशस्वी ठरत आहे. गेल्या काही महिन्यांत त्याच्या गोलंदाजीवर परिणामी त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. पण आयपीएल २०२२ मध्ये त्याने शानदार कामगिरी करत तो फिट असल्याचे सिद्ध केले आहे. त्याने ५ सामन्यांत ७६ च्या सरासरीने २२८ धावा केल्या आहेत. यात त्याच्या २ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने गोलंदाजी करताना ४ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याची ही कामगिरी पाहाता तो भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
ये हुई ना बात! जुना विराट परतला, वॉर्नर बाद झाल्यानंतर कोहलीचे आक्रमक सेलिब्रेशन पाहून सुखावले चाहते
बेंगलोरविरुद्धचे ‘ते’ षटक दिल्ली कॅपिटल्सला पडले महागात; खुद्द कर्णधाराचा खुलासा
ग्राउंड्समनच्या मुलाला जेव्हा धोनीने दिला मोलाचा सल्ला, ‘ऑफ स्पिनर्सला टी२० मध्ये सर्वच मारतात, पण…’