---Advertisement---

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पाच नामांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का 

On: बुधवार, नोव्हेंबर 30, 2022 8:51 PM
tennis
---Advertisement---
पुणे,दि.30 नोव्हेंबर 2022: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात भारताच्या हितेश चौहान, अमेरिकेच्या श्रीकेशव मुरुगेसन, तैपेईच्या चुन तांग यांनी तर, मुलींच्या गटात माया राजेश्वरन रेवती, सायना देशपांडे या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत भारताच्या हितेश चौहान याने अव्वल मानांकित अमन दहियाचा 6-4 4-6 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. अमेरिकेच्या श्रीकेशव मुरुगेसन याने दुसऱ्या मानांकित क्रिश त्यागीवर 1-6 6-0 6-2 असा सनसनाटी विजय मिळवला. तैपेईच्या चुन तांग याने तिसऱ्या मानांकित भारताच्या दक्ष प्रसादचा 6-4 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. 

मुलींच्या गटात भारताच्या माया राजेश्वरन रेवती हिने पाचव्या मानांकित थायलंडच्या कामोनवान योडपेचचा 5-7 7-5 6-4 असा पराभव करून आणखी एका सनसनाटी निकालाची नोंद केली. अमेरिकेच्या सायना देशपांडे  हिने भारताच्या दुसऱ्या मानांकित सोनल पाटीलला 7-5 6-3 असे पराभूत केले. तिसऱ्या मानांकित मधुरिमा सावंत हिने नंदिनी दीक्षितला 6-4 6-1 असे नमविले. लकी लुझर ठरलेल्या भारताच्या ऐश्वर्या जाधव हिने कडवी झुंज देत मारिया मासिआन्सकायाचा 6-3 3-6 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. अव्वल मानांकित भारताच्या  सुहिता मारुरी हिने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत नियती कुक्रेतीचा 6-3 6-3 असा पराभव केला.

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: एकेरी: मुले:
हितेश चौहान(भारत)वि.वि.अमन दहिया(भारत)[1] 6-4 4-6 6-4;

श्रीकेशव मुरुगेसन(अमेरिका)वि.वि.क्रिश त्यागी(भारत)[2]1-6 6-0 6-2
अलेक्झांडर डस्कालोविक(सर्बिया)[6] वि.वि.शंकर हेस्नाम(भारत)7-5 3-6 6-2
चुन तांग(तैपेई)वि.वि.दक्ष प्रसाद(भारत)[3] 6-4 6-4;
चिह एन हौ(तैपेई)[7 वि.वि.धनंजय अत्रेया(भारत)5-7 7-5 6-3;
बुशन होबम(भारत)[4]वि.वि.कांधवेल महालिंगम अकिलंदेश्वरी(भारत) 6-3 7-6(2);
समर्थ सहिता(भारत) वि.वि.चंदन शिवराज(भारत)6-4 7-5;
अधीरित अवल(भारत) वि.वि.तरुण कोरवार(भारत) 6-7(7) 7-5 6-1;

मुली:
सुहिता मारुरी (भारत)[1] वि.वि.नियती कुक्रेती(भारत)6-3 6-3;
तेजस्वी दबस(भारत) [6]वि.वि.हर्षिनी नागराज(भारत) 7-6(8) 6-4;
ऐश्वर्या जाधव(भारत) वि. मारिया मासिआन्सकाया6-3 3-6 6-4;
मार्गोट फंथाला(फ्रांस)[7]वि.वि.साई जानवी(भारत) 6-1 6-0;
लिडिया पॉडगोरिचानी(थायलंड)[4] वि.वि.लीन अबौहमद(ऑस्ट्रेलिया)6-1 6-3;
माया राजेश्वरन रेवती(भारत)वि.वि.कामोनवान योडपेच(थायलंड)[5] 5-7 7-5 6-4;
सायना देशपांडे (अमेरिका) वि.वि.सोनल पाटील (भारत)[2]7-5 6-3;
मधुरिमा सावंत(भारत)[3]वि.वि.नंदिनी दीक्षित(भारत) 6-4 6-1

दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
धनंजय अत्रेया (भारत)[4]/हितेश चौहान(भारत)वि.वि.शंकर हेसनम (भारत)/चुन तांग(तैपेई)7-6(3) 6-1
 बुशन होबम(भारत)[2]/दक्ष प्रसाद(भारत)वि.वि.विश्वसेनन नवनीथन(भारत)/सेहजसिंग पवार(भारत)7-5 6-1
(Gadre Marine-MSLTA ITF Grade 3 Kumar Tennis Championship: Five top players suffer defeat)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉम्बस्फोटामुळे हादरला पाकिस्तान, कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंड संघही चिंतेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---