मुंबई । आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीने विरोधी संघातल्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा हरभजन सिंग सोशल मीडियावर भज्जू पा नावाने प्रसिद्ध आहे. नुकतेच त्याने त्याच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट केल्यानंतर पुन्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या ट्विटमध्ये हरभजनने त्याच्या घरातील विजेचे बिल 33,900 रुपये आले असल्याचे सांगितले. इतके जास्त विजेचे बिल आल्याने त्याने वीज कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या हरभजन सिंग मुंबई येथे आहे.
हरभजनने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करून लिहिले की, ”इतके जास्त बिल…संपूर्ण मोहल्ल्याचे बिल पाठवले आहे की काय? सामान्य बिलापेक्षा 7 पट जास्त ??? व्वा …!” हरभजनसिंगच्या घराचे वीज बिल 33,900 रुपये आले आहे, जे पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि त्यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या कंपनीला टॅग करून आपली नाराजी व्यक्त केली.
Itna Bill pure mohalle ka lga diya kya ?? @Adani_Elec_Mum 😳😳😳ALERT: Your Adani Electricity Mumbai Limited Bill for 152857575 of Rs. 33900.00 is due on 17-Aug-2020. To pay, login to Net/Mobile Banking>BillPay normal Bill se 7 time jyada ??? Wah
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) July 26, 2020
25 मार्च 1998 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना खेळून हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल टाकले. 103 कसोटी सामने खेळणार्या हरभजनने 417 बळी घेतले आहेत. वनडेत 236 सामने खेळताना त्याने 269 आणि 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 25 बळी घेतले. आपल्या फिरकी गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना अस्वस्थ करणारा हरभजन बराच काळ भारतीय संघामधून बाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 3 मार्च 2016 रोजी संयुक्त अरब अमिराती विरुद्ध खेळला होता, जो आशिया चषक स्पर्धेसाठी टी20 सामना होता
महत्त्वाच्या बातम्या-
२०० वर्षांपूर्वी पहिले द्विशतक ठोकणाऱ्या क्रिकेटरने साकारल्यात या भूमिका; ईस्ट इंडिया कंपनीची…
स्टुअर्ट बिन्नीने ‘तो’ मोठा विक्रम मोडल्यानंतर अनिल कुंबळेनी पाठवला होता ‘हा’ खास संदेश
‘घराणेशाही’च्या आरोपामुळे त्रस्त होता हा पाकिस्तानचा खेळाडू; बाथरूममध्ये रडायचा तासंतास
ट्रेंडिंग लेख-
काय सांगता! या ३ वेळेला संपूर्ण संघाला मिळूनही करता आल्या नाहीत १० धावा
२०२० आयपीएल युएईमध्ये झाली, तर दिल्ली कॅपिटलचे हे ४ खेळाडू करु शकतात दमदार कामगिरी
भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…