आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे. बर्याचदा हार्दिक व त्याची पत्नी नताशा आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान, नुकतेच हार्दिक पांड्याने आपली पत्नी नताशाच्या एका फोटोवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिकची ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CPN3l1FgIOM/
हार्दिकची पत्नी नताशाने नुकताच इंस्टाग्रामवर स्विमिंग पूल जवळचा बिकिनीमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोवर हार्दिकने हार्ट आणि आग या इमोजी कमेंटमध्ये टाकल्या आहेत. या फोटोमध्ये नताशा खूपच हॉट दिसत आहे. नताशाचा हा फोटो सोशल मीडीयात चांगलाच वायरल होत असून, त्याचबरोबर हार्दिकच्या कमेंटनेही नेटकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
हार्दिक व नताशा नेहमीच आपले फोटो सोशल मीडियात शेयर करत असतात. मागील आठवड्यातच या जोडप्याने त्यांचा मुलगा अगस्त्यचा फोटो सोशल मीडियात शेयर केला होता.
दरम्यान, आगामी काळात भारताचा एक संघ न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात व्यस्त असेल तेव्हा, भारताचा आणखी एक संघ श्रीलंका दौर्यावर जात असेल. श्रीलंका दौऱ्यात संघाचे नेतृत्व शिखर धवन किंवा हार्दिक पंड्या करू शकतात, अशी चर्चा आहे. बीसीसीआयने श्रीलंकेच्या दौर्याचे नियोजन केले आहे, परंतु कर्णधाराबद्दल अद्याप माहिती दिली गेलेली नाही. श्रेयस अय्यर अद्याप तंदुरुस्त नसल्याचे सूत्रांकडून समजते आहे. अशा परिस्थितीत धवन किंवा हार्दिक या दोघांपैकी कोणालाही कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते.
दरम्यान, हार्दिकच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल विचार केला असता, त्याने भारताकडून 11 कसोटी, 60 वनडे व 48 टी20 सामने खेळलेले आहेत. मागील काही काळापासून तो दुखापतीमुळे सतत संघाच्या आत-बाहेर होत होता. इंग्लंडमध्ये होत असलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या भारतीय संघात हार्दिकची निवड न झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’ धोनी झाला म्हातारा? नवीन लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
निवड समीतीला पाँटिंगला करायचे होते संघाबाहेर; पण मायकल क्लार्कने केला बचाव, स्वत:च केला खुलासा
“कशाला पुढच्या जन्माची चिंता करतोस?”, कैफचा युवराजच्या ‘त्या’ कमेंटवर रिप्लाय