वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. सुमारे 6 वर्षांपूर्वी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात भूकंप आला होता. शमीनं 2014 मध्ये हसीन जहाँ नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं, जी व्यवसायानं मॉडेल आहे. परंतु 2018 मध्ये हसीन जहाँनं शमी आणि त्याच्या कुटुंबाविरोधात एफआयआर दाखल केला. तिनं शमीवर घरगुती छळ आणि गैरवर्तनाचा आरोप केला होता.
शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोपही झाले होते. परंतु काही काळानंतर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला फिक्सिंग प्रकरणात क्लीन चिट दिली. मात्र घरगुती अत्याचाराचं प्रकरण बराच काळ चाललं. दरम्यान पश्चिम बंगालमधील अलीपूर न्यायालयानं सप्टेंबर 2019 मध्ये शमीविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. काही दिवसांनी त्याचा जामीन अर्ज मंजूर झाला.
2023 मध्ये कोलकाता कोर्टानं मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँच्या प्रकरणी मोठा निकाल दिला. या अंतर्गत शमी हसीन जहाँला पोटगी म्हणून महिन्याला 1,30,000 रुपये देणार आहे. यापैकी 50 हजार रुपये शमीची पत्नी हसीन जहाँला वैयक्तिक खर्चासाठी आणि उर्वरित 80 हजार रुपये त्यांच्या मुलीच्या पालनपोषणासाठी वापरण्यात येणार आहेत. 2015 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला, जिचं नाव आयरा आहे.
2018 मध्ये हसीन जहाँनं मोहम्मद शमीविरोधात केस दाखल केली होती. तेव्हा तिनं मासिक 10 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली होती. शमीनं 2020-2021 या आर्थिक वर्षात ७ कोटींहून अधिक कमावल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलानं केला होता. अशा परिस्थितीत 10 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी चुकीची नाही, असं तिनं म्हटलं होतं. शमीचा सध्या बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये ए ग्रेडमध्ये समावेश आहे. या अंतर्गत त्याला वार्षिक 5 कोटी रुपये पगार मिळतो.
हेही वाचा –
कसोटीमध्ये टी20 स्टाईल फलंदाजी, आयपीएल गाजवणारा खेळाडू दुलीप ट्रॉफीत पुन्हा एकदा फ्लॉप
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरून गोंधळ…एसजी आणि कुकाबुरा बॉलमध्ये फरक काय?
हत्येचा आरोपी शाकिब भारतात खेळण्यासाठी येणार, कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर