यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 19वा सामना आज (9 जून) रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जात आहे. हा सामना न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती आहे. तर पाकिस्तान संघाची धुरा बाबर आझम (Babar Azam) सांभाळताना दिसणार आहे. बाबर आझमनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान 7 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यावेळी भारतीय संघानं 5 वेळा बाजी मारली आहे. तर पाकिस्तान संघ केवळ एकच सामना जिंकू शकला आणि एक सामना अनिर्णित राहिला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान- मोहम्मद रिझवान(यष्टीरक्षक), बाबर आझम(कर्णधार), उस्मान खान, फखर झमान, शादाब खान, इफ्तिकार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रीदी, हरीस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 12 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यावेळी भारतानं 9 सामन्यात बाजी मारली आहे. तर पाकिस्तान संघ केवळ 3 सामन्यांवरच वर्चस्व गाजवू शकला. यादरम्यानं भारतासाठी विराट कोहलीनं (Virat Kohli) सर्वाधिक 488 धावा ठोकल्या आहेत. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवानंनं सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत.
शेवटच्या टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडले होते, त्यावेळी पाकिस्ताननं भारतासमोर जिंकण्यासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यावेळी भारतीय संघाच्या जिंकण्य्याच्या आशा पाकिस्ताननं संपुष्टात आणल्या होत्या. कारण भारताच्या 31 धावांवरती 4 विकेट्स गेल्या होत्या परंतु विराट कोहली भारतासाठी ढाल बनून उभा राहिला आणि 53 चेंडूत 82 धावांची तुफानी खेळी खेळून भारताला सामना जिंकवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटच्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध ‘किंग’ कोहलीचा जलवा पाहा व्हिडिओ
“बाबरनं संघाचं वातावरण बिघडवलं…” शाहीद आफ्रिदी भडकला दिलं तिखट उत्तर
“विराट कोहली जर लाहोरमध्ये खेळायला आला तर…” पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य