ऑस्ट्रेलियाने आयसीसी विश्वचषक 2023 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्स राखून पराभव केला आणि आठव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. आता अंतिम सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने भारतीय संघाचे कौतुक केले आणि म्हटले की त्यांच्यात कोणतीही कमतरता नाही.
जोश हेझलवूड (Josh Hazlewood) पुढे बोलताना म्हणाला, “मला वाटते की ते सर्व छान आहेत. त्यांच्याकडे चांगले वेगवान गोलंदाज, चांगले फिरकीपटू आणि चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वकाही योग्य आहे.”
साखळी फेरीतील सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “चेन्नईमध्ये लहान लक्ष्यांचा पाठलाग करताना आम्ही त्यांच्याविरुद्ध खेळलो तेव्हा आम्हाला काही कमी दिसल्या असे मला वाटते, आम्ही लवकर काही विकेट्स मिळवण्यात ठरलो, परंतु आम्ही पाहिले त्याप्रमाणे त्यांच्यात कोणतीही कमतरता नाही.”
भारतीय संघाने स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहून अंतिम फेरी गाठली आहे. लीग टप्प्यात, संघाने आपले सर्व नऊ सामने जिंकले आणि नंतर पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक 2023 स्पर्धेत सलग 10 विजयांची नोंद केली असून आता 11व्या विजयासह विजेतेपदावर कब्जा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
सध्याच्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया साखळी टप्प्यात एकदाच आमनेसामने आले आहेत. चेन्नईत झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 199 धावांत सर्वबाद झाला होता. लक्ष्याचा पाठलाग भारताची ईशान किशन आणि रोहित शर्मा ही सलामीची जोडी एकही धाव न काढता पॅव्हेलियनमध्ये परतली, तर श्रेयस अय्यरलाही खाते उघडता आले नाही. जोश हेझलवूडने या तीनपैकी दोन फलंदाजांना आपला बळी बनवले होते. मात्र, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने सामना जिंकला.
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. यापूर्वी 2003 मध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये फायनल झाली होती, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा मोठा पराभव केला होता. अशा स्थितीत भारतीय संघाला त्या दारुण पराभवाचा बदला घ्यायची ही मोठी संधी आहे. (ICC world cup final Josh Hazlewood big statement about Indian team Said Everything for them)
म्हत्वाच्या बातम्या
‘त्या दीड तासादरम्यान मी खूपच घाबरलेलो, पण…’, INDvsNZ Semi Finalविषयी ‘थलायवा’ रजनीकांत काय म्हणाले?
Semi Final 2मध्ये 0 धावांचे योगदान देणाऱ्या बावुमाची पराभवानंतर लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘आमचे चरित्र…’