भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात कोरोना प्रोटोकॉल बद्दल वादंग निर्माण झाले होते. मात्र अशाच बातमी समोर येत आहे की भारतीय क्रिकेट संघ केवळ एका हॉटेलमध्येच थांबणार असून त्यांना बाहेर जाण्यास बंदी आहे.
भारतीय क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना निर्देश दिले आहे की त्यांनी नियमांचे पूर्णपणे पालन करावे. खेळाडूंना हॉटेल बाहेर जाण्याची परवानगी नाही. खेळाडू केवळ सरावासाठी हॉटेलबाहेर जावू शकतात. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर रोहित शर्मा, शुभमन गिल, नवदिप सैनी, पृथ्वी शॉ व रिषभ पंत हे मेलबर्न येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कोरोना प्रोटोकॉलचा भंग झाल्या संदर्भात चौकशी करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाला होता. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कोणताही वाद निर्माण करण्याच्या मानसिकतेत नाही.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील दुसरा सामना 7 जानेवारी पासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. मालिकेत दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर अजिंक्यच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करून विजय मिळवत ,मालिकेला जिवंत ठेवले आहे.दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर आत्मविश्वास वाढवलेल्या भारतीय संघाला तिसर्या कसोटीत देखील उत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
युवा खेळाडूंनी विलियम्सनचा आदर्श घ्यावा, न्यूझीलंडच्या कर्णधाराची भारताच्या माजी खेळाडूकडून स्तुती
भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियन मंत्र्याला वसीम जाफर यांचे सडेतोड उत्तर, केले असे ट्विट
व्हिडिओ : सुपरमॅन आंद्रे फ्लेचर! एकाच सामन्यात पकडले दोन अविश्वसनीय झेल