भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पुनर्निधारित पाचवा कसोटी सामना शुक्रवारपासून (०१ जुलै) ऍजबस्टन येथे सुरू होणार आहे. भारतीय संघ या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. अशात दोन्हीही संघांची नजर हा अखेरचा सामना जिंकण्यावर असेल. या सामन्यादरम्यान काही खेळाडूंकडे खास विक्रम करण्याची संधी असेल. त्याच विक्रमांबद्दल जाणून घेऊ…
१५ वर्षांचा दुष्काळ संपणार?
भारतीय संघाने गेल्या १५ वर्षांत इंग्लंडमध्ये एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. त्यामुळे जर भारतीय संघाने ऍजबस्टन येथे होणारा पाचवा कसोटी सामना अनिर्णीत जरी राखला, तरीही ही मालिका २-१ च्या फरकाने त्यांच्या नावावर होईल. अशाप्रकारे भारतीय संघ २००७ नंतर पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकेल. यादरम्यानच्या काळात भारतीय संघाला इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध २०११ मध्ये ४-० ने, २०१४ मध्ये ३-१ ने आणि २०१८ मध्ये ४-१ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.
जॉनी बेयरस्टो बनेल दशहजारी
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो सध्या धडाकेबाज फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९८८३ धावा पूर्ण केल्या आहेत. अशात जर त्याने पाचव्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात मिळून जर ११७ धावा केल्या, तर तो इंग्लंडकडून त्याच्या १० हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करेल.
दोन विक्रमांच्या जवळ आहे अश्विन
भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याच्याकडे या सामन्यादरम्यान २ कारनामे करण्याची संधी असेल. तो या सामन्यात ८ विकेट्स घेताच त्याच्या कसोटी क्रिकेटमधील ४५० विकेट्स पूर्ण करेल. याबरोबरच तो बॅटने ६९ धावा करताच कसोटीतील त्याच्या ३ हजार धावा पूर्ण करेल.
रिषभ पंत करू शकतो शकतो ३ कारनामे
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने जर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एकही षटकार मारला तर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० षटकार पूर्ण होतील. याखेरीज जर तो ६ षटकार मारण्यात यशस्वी ठरला, तर त्याचे कसोटी क्रिकेटमधील ५० षटकार पूर्ण करेल. तसेच जर त्याने ८० धावा केल्या तर कसोटी क्रिकेटमधील २००० धावांचा आकडा गाठेल.
स्टुअर्ट ब्रॉड करू शकतो ५५० विकेट्सचा आकडा पूर्ण
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने जर भारताच्या एकाही फलंदाजाला बाद केले, तर तो कसोटी क्रिकेटमधील त्याच्या ५५० विकेट्स पूर्ण करेल. असे झाल्यास, तो हा पराक्रम करणारा इंग्लंडचा तिसरा आणि जगातील सहावाच गोलंदाज बनेल. याखेरीज जर त्याने संपूर्ण सामन्यात ८ विकेट्स घेतल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या ८०० विकेट्स पूर्ण होतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विराटवर पुन्हा ‘ती’ दणकेबाज खेळी खेळण्याची जबाबदारी, जिंकून देऊ शकतो निर्णायक कसोटी
भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ३६वा कर्णधार असेल बुमराह, पहिल्या कॅप्टनचे नाव माहितीय का?
‘विराटने शतक नाही केलं तरी चालेल…’, प्रशिक्षक राहुल द्रविडची स्पष्ट भूमिका